दारव्हा येथे विहिंप-बजरंग दलाची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 10:18 PM2019-07-10T22:18:56+5:302019-07-10T22:20:03+5:30

देशात हिंदूद्रोही व देशविरोधी कारवाया वाढल्याचा आरोप करीत या कारवायांवर अंकुश लावण्याची मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने येथील उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली.

Vihamp-Bajrang Dal's demonstrations at Darwha | दारव्हा येथे विहिंप-बजरंग दलाची निदर्शने

दारव्हा येथे विहिंप-बजरंग दलाची निदर्शने

Next
ठळक मुद्देएसडीओंना निवेदन : हिंदूद्रोही व देशद्रोह्यांवर अंकुश लावण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : देशात हिंदूद्रोही व देशविरोधी कारवाया वाढल्याचा आरोप करीत या कारवायांवर अंकुश लावण्याची मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने येथील उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली.
काही वर्षांपासून अलगाववादी मानसिकतेतून काही इस्लामीक जिहादी संघटनांकडून हिंदू समाज व धार्मिक स्थळावर खुलेआमपणे हल्ले करण्यात येत आहे. दुसरीकडे छोट्या छोट्या घटनांना वाढवून ग्रामीण, गोरक्षक, रामभक्त व राष्ट्रवादींना बदनाम करण्यासाठी षड्यंत्र रचण्याचा प्रयत्न केला जात आहे. छोट्या-छोट्या मुली तसेच हिंदू बहिणींवर अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे देश बदनाम होत आहे.
लव जिहाद, हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतरण, तसेच केरळ, बंगाल, कर्नाटकात हिंदूंवर आक्रमण, दिल्ली येथील चांदनी चौकातील मंदिर व घरांवरील आक्रमकण आणि सुरत, जयपूर व रांची येथे भारतविरोधी हिंसक प्रदर्शनांमुळे हींदु समाजात आक्रोश असल्याचे निवेदनातून म्हटले आहे.
देशात अराजकता व अराष्ट्रीय प्रचार व प्रत्यक्ष हल्ले करणाºया सर्व जिहादी व कथीत धर्मनिरपेक्ष लोकांकडून होत असलेल्या कारवायांवर अंकुश लावण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर अक्षय डेहणकर, धनंजय बलखंडे, सागर खेडकर यांच्यासह विश्व हिंदू परिषद व बजरंग दल पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षºया आहे.

Web Title: Vihamp-Bajrang Dal's demonstrations at Darwha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.