विजय दर्डा : ‘मेडिकल’ अभ्यागत मंडळाची बैठक

By admin | Published: August 9, 2014 01:21 AM2014-08-09T01:21:46+5:302014-08-09T01:21:46+5:30

रुग्णांवर नातेवाईक समजून उपचार करा

Vijay Darda: Meeting of 'Medical' Visitors Board | विजय दर्डा : ‘मेडिकल’ अभ्यागत मंडळाची बैठक

विजय दर्डा : ‘मेडिकल’ अभ्यागत मंडळाची बैठक

Next

यवतमाळ : वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मोठी अपेक्षा असते. मात्र दिवसेंदिवस आरोग्य यंत्रणेत संवेदनशीलता कमी होत असल्याचे दिसते. वशिला असलेल्यांवरच लवकर उपचार होतात, अशी धारणा झाली आहे. रुग्णांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी डॉक्टरांनी प्रत्येक रुग्णाला आपला नातेवाईक समजून उपचार करावे, असे भावनिक आवाहन लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन तथा वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष खासदार विजय दर्डा यांनी उपस्थित डॉक्टरांना दिले.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित अभ्यागत मंडळाच्या बैठकीला पालकमंत्री शिवाजीराव मोघे, आमदार वामनराव कासावार, आमदार ख्वॉजा बेग, आमदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार संदीप धुर्वे, जिल्हाधिकारी राहुलरंजन महिवाल, अधीष्ठाता डॉ.आनंद डोंगरे, आरोग्य उपसंचालक अविनाश लव्हाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्यासह अभ्यागत मंडळाचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष खासदार विजय दर्डा यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील विविध समस्या आणि रुग्णसेवेबाबतचा आढावा घेऊन उपस्थित डॉक्टरांना निर्देश दिले.
खासदार दर्डा म्हणाले, रक्त देण्याच्या पारंपरीक पद्धतीत बदल झाला आहे. नव्या पद्धतीने रुग्णाला संक्रमण होत नाही. याबाबत विभाग प्रमुखांनी माहिती घ्यावी. रिक्त पदांच्या संदर्भात मुंबई येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक लावून समस्या निकाली काढणार असल्याचे सांगितले. याची सविस्तर टिपणी देण्याचे निर्देश अधिष्ठातांना दिले. महाविद्यालयात बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम नसल्याची त्रुटी आहे. सध्या अस्तित्वात असलेले नर्सिंग विद्यालय जिल्हा शल्य चिकित्सकाच्या अधिपत्याखाली आहे. आरोग्य सेवा विभागाने आरोग्य शिक्षण विभागाकडे विद्यालय हस्तांतरित करावे. यासाठी राज्य शासन स्तरावर पालकमंत्र्याची मदत घ्यावी, असे सांगितले.

Web Title: Vijay Darda: Meeting of 'Medical' Visitors Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.