देशसेवा करून आलेल्या सैनिकांचे यवतमाळ जिल्ह्यातील गावकऱ्यांनी केले जंगी स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 11:22 AM2021-02-09T11:22:52+5:302021-02-09T11:24:22+5:30
Yawatmal News यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील प्रेमेन्द्र पडगिलवार हे आपल्या राहत्या गावी बोरीअरबला परतले असता गावकऱ्यांनी त्यांची खुल्या जीपमधून सहपरिवार मिरवणूक काढून गावात जंगी स्वागत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील प्रेमेन्द्र पडगिलवार हे भारतीय सैनिक दलात 21 वर्ष पूर्ण करून निवृत्त झाले आहे. ते आपल्या राहत्या गावी बोरीअरबला परतले असता गावकऱ्यांनी गावाच्या वेशी वरूनच ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतीषबाजीत त्यांची खुल्या जीपमधून सहपरिवार मिरवणूक काढून गावात जंगी स्वागत केले.
प्रेमेन्द्र पडगीलवार हे 1999 मध्ये सीमा सुरक्षा दलात नोकरीला लागले, तब्बल 21 वर्ष देशसेवा करून काल ते आपल्या गावी परतले असता गावकऱ्यांचा स्नेह पाहून भारावून गेले. देशभक्तीपर गीतांच्या तालावर गावकऱ्यांनी ही ताल धरीत फटाक्यांच्या आतषबाजीत सैनिक प्रेमेन्द्र यांची सपत्नीक गावाच्या वेशी पासून तर त्यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढली. यावेळी देशसेवा करून परत आलेल्या मुलाकडे पाहून सैनिक प्रेमेन्द्र यांच्या आईचाही उर भरून आला होता. गावकऱ्यांनी केलेले स्वागत हे अभूतपूर्व असल्याचे मत यावेळी प्रेमेन्द्र पडगिलवार यांनी व्यक्त केले