सावळी परिसरात कोरोना चाचणीला ग्रामस्थांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:41 AM2021-05-23T04:41:41+5:302021-05-23T04:41:41+5:30
ईचोरा, दातोडी, माळेगाव, वरूड, सावळी सदोबा, आयता आदी गावांमध्ये शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आर्णी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ...
ईचोरा, दातोडी, माळेगाव, वरूड, सावळी सदोबा, आयता आदी गावांमध्ये शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आर्णी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव, दातोडी, ईचोरा, वरुड येथे शिबिर घेण्यात आले. त्यात आरटीपीसीआर व रॅपिड टेस्ट करण्यात आली. शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
माळेगाव ९७ लोकांची तपासणी करण्यात आली. यात एकही पॉझिटिव्ह आढळून आला नाही. ग्रामस्थांनी मनात कोणतीही भीती ठेवू नये, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले. चाचणीसाठी आरोग्य सेवक नीलेश देवस्थळे, युवराज जाधव, बी. डी. किनाके, सीमा राठोड, प्रेमला चव्हाण, सीमा पाटील, कविता कयापाक, जनार्धन कांबळे, सुनील राठोड, बी. बी. इंगळे, विनोद राठोड, नंदकिशोर कोहरे आदींनी सहकार्य केले.