संभाजी भिडे यांच्या विरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक; तीव्र निदर्शने, सभा उधळण्याचा इशारा

By सुरेंद्र राऊत | Published: July 29, 2023 11:51 AM2023-07-29T11:51:23+5:302023-07-29T11:52:30+5:30

भिडेंचे फोटो असलेले फलक फाडले

Violent protests against Sambhaji Bhide in Yavatmal, warning to disrupt meeting | संभाजी भिडे यांच्या विरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक; तीव्र निदर्शने, सभा उधळण्याचा इशारा

संभाजी भिडे यांच्या विरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक; तीव्र निदर्शने, सभा उधळण्याचा इशारा

googlenewsNext

यवतमाळ : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या विरोधात यवतमाळ शहरात आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.  शनिवारी भिडे  यांची सभा आयोजित केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर संतप्त पडसाद उमटले आहे.

महापुरुषांविरोधात वादग्रस्त वक्तव्य तसेच नेहमी अतार्किक मुद्दे मांडून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम संभाजी भिडे करीत आहे आणि शासन त्याला पाठबळ देत आहे असा आरोप आंबेडकरी संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे. संभाजी भिडे हे अस्मितेचा ध्वज उभारणीसाठी शहरातील हनुमान आखाडा चौकात आले असता तिथे तणाव निर्माण झाला होता. भिडेंचे फलक फडणाऱ्या कार्यकरताना पोलिसांनी त्याब्यात घेतले होते.

महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे संभाजी भिडे यांचे आज यवतमाळ मध्ये व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या स्वागतासाठी लावलेले फलक काहींनी फाडल्याने तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यवतमाळ विभागाच्या वतीने  हे व्याख्यान आयोजित असून स्वातंत्र्यवीर सावरकर चौक मित्र परिवार व दुर्गोत्सव मंडळा तर्फे भीडेंच्या हस्ते अस्मितेचा ध्वज उभारण्यात येणार आहे. संभाजी भिडे यांचे हे कार्यक्रम उधळून लाऊ असा ईशारा  आंबेडकरी जनआक्रोश मोर्चा, वंचित बहुजन आघाडी, भीम टायगर सेना आदींनी दिला असल्याने तणाव निर्माण होण्याची स्थिती आहे.

Web Title: Violent protests against Sambhaji Bhide in Yavatmal, warning to disrupt meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.