दारव्हा येथे व्हर्च्युअल लॅब कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:41 AM2021-04-08T04:41:21+5:302021-04-08T04:41:21+5:30
कार्यशाळेत शिवाजी सायन्स कॉलेज अमरावतीचे डॉ. पंकज नागपुरे व्याख्याते होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास राऊत होते. डॉ. किशोर हुरडे, ...
कार्यशाळेत शिवाजी सायन्स कॉलेज अमरावतीचे डॉ. पंकज नागपुरे व्याख्याते होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास राऊत होते. डॉ. किशोर हुरडे, डॉ. अनंत वडतकर, आयक्यूएसी समन्वयक डॉ. प्रशांत बागेश्वर, नाशित खान, अर्फा इनामदार प्रामुख्याने उपस्थित होते. कोरोना महामारीच्या संकटामुळे वर्षभरापासून विद्यार्थी महाविद्यालयात येऊ शकले नाहीत. परिणामी त्यांचा शैक्षणिदृष्ट्या तोटा झाला आहे. लेखी स्वरूपातला अभ्यासक्रम ऑनलाईन घेणे सुरू आहे. मात्र, प्रात्यक्षिक अभ्यासक्रम कसा घ्यावा, हा प्रश्न निर्माण झाला होता.
यामुळे वर्कशाॅप ऑन फिजिक्स व्हर्चुअल लॅब कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी डॉ. नागपुरे यांनी महाराष्ट्र सरकारने कार्यान्वित केलेल्या अमृता व्हर्च्युअल लॅब या ॲपवर कंपाऊंड पेंडुलम, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, कॉमन एम्मीटर अम्पलिफायर, टॉर्शनल पेंडुलम अशी जवळजवळ ८ ते ९ प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. कार्यशाळेत ९६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. अंतिम सत्रात बीएस्सी भाग-२ चा विद्यार्थी फुरकान अहमद खान याने कार्यशाळेबद्दल आपला अभिप्राय नोंदविला.
विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, सचिव डॉ. संगीता घुईखेडकर यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळा घेण्यात आली. सूत्रसंचालन भौतिकशास्त्र विभागाच्या प्रा. धनश्री कोठेकर यांनी केले.