पैनगंगा अभयारण्यात दोन पट्टेदार वाघांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:37 AM2021-03-14T04:37:15+5:302021-03-14T04:37:15+5:30

पैनगंगा अभयारण्यात सध्या जंगली प्राण्यांचा वावर वाढला आहे. वाघ तसेच बिबट्यांमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच ...

Visitation of two leopard tigers in Panganga Sanctuary | पैनगंगा अभयारण्यात दोन पट्टेदार वाघांचे दर्शन

पैनगंगा अभयारण्यात दोन पट्टेदार वाघांचे दर्शन

Next

पैनगंगा अभयारण्यात सध्या जंगली प्राण्यांचा वावर वाढला आहे. वाघ तसेच बिबट्यांमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच जेवली येथे अंगणात झोपलेल्या मुलावर वाघाने हल्ला केला होता. शुक्रवारी रात्री बिबट्याने ढाणकीजवळील एका शेतात गाईच्या वासरावर हल्ला करून ठार केले. आता खरबी रेंजमध्ये दोन वाघांचे दर्शन झाल्याने पैनगंगा अभयारण्यातील नागरिक घाबरले आहेत. नागरिकांनी सतर्क राहून जंगलात गुरे घेऊन तसेच लाकडे आणण्यासाठी जाऊ नये, असे अवाहन वनविभागाने केले आहे.

मेळघाट प्रकल्प अधिकारी रेड्डी यांनी खरबी पैनगंगा अभयारण्यात पर्यटनस्थळाचे उद्घाटन केले आहे. या भागात प्राण्यांचा मुक्त संचार असतो. त्यामुळे या भागामध्ये पर्यटक येत असतात. अनेक पर्यटकांना वन्यप्राण्यांचे दर्शन होत आहे; पण या पट्टेदार वाघांमुळे नागरिकांमध्ये एकच दहशत निर्माण झाली आहे.

Web Title: Visitation of two leopard tigers in Panganga Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.