‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची मूकबधिर व अपंग विद्यालयास भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 09:49 PM2017-10-02T21:49:38+5:302017-10-02T21:49:59+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी वडगाव परिसरातील वसंतराव नाईक अंध-मूक-बधिर व अपंग निवासी विद्यालयाला भेट दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी वडगाव परिसरातील वसंतराव नाईक अंध-मूक-बधिर व अपंग निवासी विद्यालयाला भेट दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. अभियंता दिन आणि शिक्षक दिनाच्या संयुक्त कार्यक्रमानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वर्षा परिहार, शिक्षक घोलप प्रामुख्याने उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील ‘ईटा’ व आयएसएफ स्टुडंट क्लब तसेच रासेयो पथक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमाची सुरुवात जेडीआयईटीच्या परिसरात वृक्षारोपणाने करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, विभाग प्रमुख डॉ. संजय गुल्हाने, ‘ईटा’ विद्यार्थी प्रमुख उमाकांत गौलकर आदी उपस्थित होते.
‘ईटा’ क्लबच्या समन्वयक प्रा. प्रगती पवार, प्रा. केतन हांडे, प्रा. अनुप पाचघरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. अभय राठोड, प्रा. पीयूष हेगू, प्रा. पद्मिनी कौशिक, प्रा. अतुल शिंगाडे, प्रा. भारूक, प्रा. वैभव पंडित, प्रा. नीलेश पटेल, प्रा. सोनल मिश्रा आदींची या उपक्रमप्रसंगी उपस्थिती होती. संचालन अनुजा मिस्कीन हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा यांनी आयोजकांचे कौतुक केले.