व्हिटॅमिन व कॅल्शियम आयुष्याची शिदोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 09:31 PM2019-06-28T21:31:49+5:302019-06-28T21:32:02+5:30

सुरक्षित मातृत्व आणि बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी सकस आहार, व्हिटॅमिन आणि कॅल्शियम आयुष्याची शिदोरी ठरू शकते. यासाठी गर्भवतीसह कुटुंबातील जबाबदार व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्या अध्यक्ष डॉ. प्रीती काबरा यांनी मांडले आहे.

Vitamin and calcium life inspection | व्हिटॅमिन व कॅल्शियम आयुष्याची शिदोरी

व्हिटॅमिन व कॅल्शियम आयुष्याची शिदोरी

Next
ठळक मुद्देप्रीती काबरा : सुरक्षित मातृत्व व सुदृढ बाळ हेच ध्येय

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सुरक्षित मातृत्व आणि बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी सकस आहार, व्हिटॅमिन आणि कॅल्शियम आयुष्याची शिदोरी ठरू शकते. यासाठी गर्भवतीसह कुटुंबातील जबाबदार व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्या अध्यक्ष डॉ. प्रीती काबरा यांनी मांडले आहे.
गर्भवतीने कुठला आहार घ्यावा, उपचार आणि काय दक्षता घ्यावी याविषयी डॉ. काबरा यांनी माहिती दिली. गरोदरपणात पहिले चार महिने बाळ आकार घेते. याच काळात गर्भवतीला उलटी, मळमळ सुरू होण्यासोबतच अन्नाची वासना उडते. याच कारणाने बहुतेक गर्भवती माता महत्त्वाचे व्हिटॅमिन घेणे टाळतात. व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे बाळाची व्यवस्थित वाढ होत नाही. गर्भवतीमध्ये बीपी, झटके, कमी दिवसात प्रसूती, गर्भजल कमी होणे आदी लक्षणे दिसू लागतात. गर्भस्थ शिशु कमी वजनाचे, त्याचे हाड विशेषत: लांब हाडांची उंची खुंटते, मेंदू व हृदयाचे विकार होते. प्रसूतीनंतर स्पेशल केअर युनीटला बाळ भरती करावे लागते.
या सर्व बाबी टाळण्यासाठी गर्भवतीने जेवण दर दोन-तीन तासांनी घेणे, सकाळी उठल्याबरोबर भाकरी खाणे, शक्यतो तिखट, अती आंबट, तळलेले पदार्थ, ठेचा खाणे टाळणे गरजेचे आहे. सायंकाळी दूध पोळी, मुगाची खिचडी, पातळ सोजी आणि रात्री झोपताना एक बिस्कीट किंवा टोस्ट घेतल्यास उलटी, मळमळ कमी होते. पुढील पाच महिन्यात आयर्न, कॅल्शियम व व्हिटॅमिन डी अत्यंत महत्त्वाचे आहे. एक लिटर चांगल्या दुधात एक ग्रॅम कॅल्शियम असते. कुठलीही गर्भवती दीड ते दोन लिटर दूध घेऊ शकत नाही आणि पचवू शकत नाही. म्हणून सोबत दिवसातून दोनवेळा कॅल्शियमची गोळी घेणे गरजेचे आहे. टाळल्यास शरीराच्या हाडातील कॅल्शियमचा ºहास होऊन कंबर, हात-पायदुखी वाढते, बीपीचा त्रास सुरू होतो.
व्हिटॅमिन डी अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. हा घटक व्यवस्थित असल्यास कॅल्शियम व फॉस्फोरसची पातळी व्यवस्थित राहते. गर्भवती मातेची बीपी, बाळाची वाढ व्यवस्थित होते. कमी दिवसाचे, कमी वजनाचे बाळ आणि मातेला झटके येण्याचा प्रकार कमी असतो. या औषधी गर्भवतीने बाळाची गरज समजून घेतल्यास ऐन प्रसूतीच्यावेळी रक्ताची गरज भासणार नाही. सुरक्षित माता व सुदृढ बाळ हेच स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेचे ध्येय आहे, असे डॉ. प्रीती काबरा यांनी म्हटले आहे.

Web Title: Vitamin and calcium life inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.