विवेकानंद विद्यालय प्रथम
By admin | Published: February 1, 2017 01:35 AM2017-02-01T01:35:44+5:302017-02-01T01:35:44+5:30
प्रेरणास्थळ आयोजन समिती आणि हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळ व शारीरिक शिक्षण
प्रेरणास्थळ आयोजन समिती : देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा
यवतमाळ : प्रेरणास्थळ आयोजन समिती आणि हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळ व शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या वतीने प्रेरणास्थळ येथे सामूहिक देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. यात विवेकानंद विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळविला.
तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळ व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रताप पारसरकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सचिव विजय देशमुख, प्राचार्य डॉ. जेकब दास, प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके उपस्थित होते.
या स्पर्धेत आठ शाळा सहभागी झाल्या होत्या. यामध्ये प्रथम १५०१ रुपयाचे बक्षिस विवेकानंद विद्यालयाने पटकाविले. व्दितीय १००० रुपयाचे बक्षिस जवाहरलाल दर्डा इग्लिश मेडियम स्कूलने तर तृतिय ७५१ रुपयांचे बक्षिस वाधवानी महाविद्यालयाने पटकाविले. या स्पर्धेत यवतमाळ पब्लिक स्कूल, शिक्षणाशास्त्र विद्यालय, केंद्रिय विद्यालय, बालसंस्कार गृह, स्कूल आॅफ स्कॉलर्स आदी शाळा महाविद्यालयांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन दर्जेदार देशभक्तीपर गीते सादर केली. परिक्षक म्हणून सोनाली तिडके व गुगीलवार यांनी काम पाहले. या स्पर्धेला विद्यार्थी, पालक व शिक्षकांची मोठी उपस्थिती होती. संचालन प्रा. अजय कोलारकर यांनी केले. यशस्वीतेसाठी डॉ. सुहास तिवळणकर, डॉ. विरेंद्र तलरेजा, प्रा. अभय भिष्म, प्रा. प्रेमेंद्र रामपूरकर, प्रा. सदानंद मेश्राम, डॉ. संतोषी साहुळकर यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)