८० हजार मतदारापर्यंत वोटर स्लिप गेल्या नाही; नागरिकांच्या तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 05:25 PM2024-11-19T17:25:54+5:302024-11-19T17:27:53+5:30

त्या मतदारांसाठी हेल्पलाइन सेंटर : बीएलओंकडे जबाबदारी

Voter slip did not go to 80 thousand voters; Citizen complaints | ८० हजार मतदारापर्यंत वोटर स्लिप गेल्या नाही; नागरिकांच्या तक्रारी

Voter slip did not go to 80 thousand voters; Citizen complaints

रूपेश उत्तरवार 
लोकमत न्यूज नेटवर्क 
यवतमाळ :
जिल्ह्यातील मतदारांना आपले मतदान कुठे आहे, याची माहिती मिळावी म्हणून व्होटर स्लिप वितरित करते. ग्रामीण भागात व्होटर स्लिपचा प्रश्न येत नाही. मात्र, शहरी भागात व्होटर स्लिप मिळत नाही. लोकसभा निवडणुकीत ह्या तक्रारी होत्या. यावेळी निवडणूक विभागाने कंबर कसली आहे. गत चार दिवसांपासून व्होटर स्लिप वितरण केले जात आहे. मात्र, अजूनही ८० हजार मतदारांना व्होटर स्लिप मिळाल्या नाही. अशा मतदारांसाठी व्होटर हेल्पलाईन सेंटर असणार आहे.


जिल्ह्यात २२ लाख ५२ हजार १७१ मतदार आहेत. यात ११ लाख ५० हजार ३९८ पुरुष मतदार, तर ११ लाख एक हजार ७१२ महिला मतदार आहेत. या मतदारांना त्यांच्या घरापर्यंत व्होटर स्लिप वितरणाची मोहीम निवडणूक विभागाने हाती घेतली आहे बीएलओंच्या माध्यमातून ह्या व्होटर स्लिप वितरित केल्या जात आहेत. चार दिवसांपासून ही मोहीम राबविली जात असताना अनेकांना व्होटर स्लिप मिळाली नाही. यात अनेक बाबी कारणीभूत ठरल्या आहेत. वोटर घरी नाही, काही स्थलांतरित झाले आहेत. तर काही घरापर्यंत बीएलओ पोहोचले नाही. यातून या मतदानाच्या वोटर स्लिपचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील कुठल्याही मतदान केंद्रावर मतदाराला आपले नाव कुठल्या ठिकाणी यादीमध्ये प्रसिद्ध झाले आहे याची माहिती मिळविता येणार आहे. याशिवाय, शहरातील चौकांमध्ये स्कॅनर बोर्ड लावण्यात आले आहे. या स्कॅनर बोर्डवर स्मार्टफोनवरून स्कॅन करून वोटर मतदार यादी संदर्भातील माहिती काही क्षणात मिळविता येणार आहे. यामुळे मतदारांची होणारी धावपळ टळणार आहे. प्रत्येक बीएलओकडे असलेल्या स्मार्टफोनवरूनही आपले मतदान केंद्र शोधता येणार आहे.


यवतमाळ विधानसभा क्षेत्रात वाटपाचे प्रमाण घटले
यवतमाळ विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक तीन लाख ७१ हजार २७९ मतदार येतात. यापैकी तीन लाख २३ हजार ८२८ मतदारापर्यंत व्होटर स्लिप पोहोचल्या. या ठिकाणच्या ४७ हजार ४५१ मतदारांना अद्याप व्होटर स्लिप मिळायच्या आहेत. सात विधानसभा क्षेत्रातील अर्ध्या अधिक व्होटर स्लिप वितरणाचे काम यवतमाळात माघारले आहे. या ठिकाणी ८७.२२ टक्के मतदान पार पडले आहे.


पुसद विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक वितरण 
पुसद विधानसभा क्षेत्रात तीन लाख २१ हजार ८२६ मतदारांना ह्या स्लिप वितरित करायच्या होत्या. यापैकी तीन लाख १९ हजार ६३६ मतदारांच्या घरपर्यंत ओटर स्लिप पोहोचल्या आहेत. वितरण प्रक्रियेत पुसद विभाग आघाडीवर आहे


तर मतदान केंद्रावर मिळणार माहिती 
ज्या मतदारांना व्होटर स्लिप मिळाली नाही अशा मतदारांना व्होटर स्लिप हेल्पलाईन सेंटरवर ही माहिती मिळणार आहे. असे सेंटर प्रत्येक मतदान केंद्रावर राहणार आहे. यात मतदारांना आपले नाव कुठे आहे याची माहिती मिळणार आहे.

Web Title: Voter slip did not go to 80 thousand voters; Citizen complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.