Maharashtra Election 2019; यवतमाळ शहरात मतदारांचे करण्यात आले अनोखे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 08:32 AM2019-10-21T08:32:43+5:302019-10-21T08:33:50+5:30
यवतमाळ जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी मतदान सुरू झाले. शहरातील मंत्री नगर परिषद संजय गांधी शाळेत मात्र सकाळी काही वेगळेच दृश्य होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी मतदान सुरू झाले. शहरातील मंत्री नगर परिषद संजय गांधी शाळेत मात्र सकाळी काही वेगळेच दृश्य होते.
येणाऱ्या मतदारांचे स्वागत कापडी पिशवी व गुलाबाने केले जात होते. स्त्रियांना हळदीकुंकू लावून त्यांचे स्वागत करण्यात येत होते. याशिवाय एक सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. या सेल्फी पॉईंटला पंख लावण्यात आले होते.
मतदानाची टक्केवारी वाढावी हा यामागचा उद्देश असल्याचे त्या केंद्रातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
मतदान केंद्रावरील या अनोख्या स्वागताची चर्चा व बातमी शहरात वेगाने पसरून त्याचीच चर्चा सर्वत्र सुरू होती.