वडगावचा ‘एएसआय’ एसीबीच्या जाळ्यात

By admin | Published: November 20, 2015 02:50 AM2015-11-20T02:50:45+5:302015-11-20T02:50:45+5:30

शहरातील वडगाव रोड ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला ठाण्यासमोर १५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी रंगेहात अटक केली.

Wadgaon's 'ASI' in the ACB trap | वडगावचा ‘एएसआय’ एसीबीच्या जाळ्यात

वडगावचा ‘एएसआय’ एसीबीच्या जाळ्यात

Next

दीड हजारांची लाच : ठाण्यासमोरच अटक
यवतमाळ : शहरातील वडगाव रोड ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला ठाण्यासमोर १५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी रंगेहात अटक केली.
सहायक पोलीस उपनिरीक्षक मधुकर डमरुजी कांबळे (५३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यवतमाळातील डेहणकर ले-आऊट परिसरात राहणाऱ्या युवकाविरोधात एका कंपनीच्या कर्मचाऱ्याने तक्रार दाखल केली होती. याची अदखल पात्र गुन्हा म्हणून नोंद घेण्यात आली होती. या प्रकरणात मधुकर कांबळे याने सदर युवकाला सातत्याने पैशाची मागणी सुरू केली. यामुळे त्रस्त झालेल्या युवकाने थेट अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून पोलीस अधीक्षक एम.डी. चिमटे यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी वडगाव रोड पोलीस ठाणे परिसरात सापळा रचला. शासकीय पंचासमक्षच मधुकर कांबळे याने १५०० रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर लागलीच त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.डी. चिमटे, अपर पोलीस अधीक्षक विलास देशमुख, आर.बी. मुळे, राजवंत आठवले, कैलास सानप, अक्षय हरणे, तुषार देशमुख यांनी केली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. घटनेने पोलीस विभागात खळबळ निर्माण झाली. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Wadgaon's 'ASI' in the ACB trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.