खडकडोह गावात शिरला वाघ

By admin | Published: September 15, 2015 05:13 AM2015-09-15T05:13:27+5:302015-09-15T05:13:27+5:30

झरी तालुक्यातील खडकडोह येथे रविवारी मध्यरात्री अचानक वाघ शिरला. या वाघाने तेथील एका बकरीला ठार केले, तर

Wagh in Khaddhod village | खडकडोह गावात शिरला वाघ

खडकडोह गावात शिरला वाघ

Next

वणी : झरी तालुक्यातील खडकडोह येथे रविवारी मध्यरात्री अचानक वाघ शिरला. या वाघाने तेथील एका बकरीला ठार केले, तर दुसऱ्या बकरीला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे ग्रामस्थ मात्र प्रचंड भयभीत झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गेल्या महिन्यातसुद्धा याच परिसरातील दोन गायीला वाघाने फस्त केले होते. तेव्हापासून या परिसरात वाघाची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. अशातच रविवारी मध्यरात्री अचानक रामचंद्र नैताम यांच्या घराजवळील गोठ्यात वाघाने प्रवेश केला. तेथे बांधून असलेली त्यांची एक बकरी वाघाने फस्त केली. त्यानंतर सखाराम नांदेकर यांच्या घराजवळ बांधून असलेल्या बकरीवर वाघाने हल्ला केला. यात बकरी गंभीर जखमी झाली.
रविवारी रात्री या परिसरात दमदार पाऊस झाला. त्यामुळे गावातील वीज गुल झाली होती. अशातच वाघाने गावात प्रवेश करून दोन बकऱ्यावर हल्ला चढविला. यात रामचंद्र नैताम यांचे पाच हजारांचे नुकसान झाले. ही बाब सकाळी लक्षात आल्यावर शेतकऱ्यांनी लगेच वनविभागाला माहिती दिली.
त्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची ग्वाही दिली. तेव्हा वनकर्मचाऱ्यांना गावकऱ्यांचा रोषाचाही सामना करावा लागला. या परिसरात नेहमीच वाघाचे हल्ले होत असून चिंचघाट, अडकोली, जुनोनी, पवनार आदी गावे वाघाच्या दहशतीत सापडली आहे. या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी मात्र वनविभाग सपशेल अयशस्वी ठरत आहे. वनविभागाच्या या दुर्लक्षीत धोरणामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना शेती करणेसुद्धा कठीण झाले आहे. वारंवार वाघाचे हल्ले होत असल्याने शेतमजूरसुद्धा शेतात जाण्यासाठी तयार नसतात. त्यामुळे शेतीपिकांच्या उत्पादनावर परिणाम पडत आहे. वनविभागाने निद्रावस्थेतून जागे होऊन वाघाचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

महावितरणच्या अवकृपेमुळे नागरिकांमध्ये भिती
४या परिसरात रात्रीच्या वेळी बहुतांश वेळा वीज राहत नाही. त्यामुळे गावात अंधार असतो. रविवारी रात्री वीज गेल्याने गावात वाघा आला, हे कुणालाही ठाऊक नव्हते. परंतु वाघाने गावात शिरून बकरी ठार केल्याचे कळताच ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे. महावितरणने या परिसरात रात्रीच्या वेळी वीज सदैव सुरू ठेवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Wagh in Khaddhod village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.