वाघाडी नदीला ‘अच्छे दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 11:50 PM2019-02-10T23:50:49+5:302019-02-10T23:51:45+5:30
तालुक्यातून वाहणाऱ्या वाघाडी नदीवर दोन सिमेंट बंधारे बांधले जात असल्याने नदीला ‘अच्छे दिन’ येणार आहे. वाघाडी नदी जानेवारीतच कोरडी पडते. त्यामुळे अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसते. या नदीवर दहा गावांची पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : तालुक्यातून वाहणाऱ्या वाघाडी नदीवर दोन सिमेंट बंधारे बांधले जात असल्याने नदीला ‘अच्छे दिन’ येणार आहे. वाघाडी नदी जानेवारीतच कोरडी पडते. त्यामुळे अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसते. या नदीवर दहा गावांची पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. तसेच सिंचन अवलंबून आहे. मात्र नदी कोरडी पडत असल्याने शेतकºयांना सिंचन करता येत नाही. आता आमदार प्रा.राजू तोडसाम यांच्या पाठपुराव्यामुळे वाघाडी नदी पुनर्जीवित करण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून संगम सावंगी येथे ५९ लाख रुपये खर्चून सिमेंट साठवण बंधारा बांधला जात आहे.
इंजाळा येथेही ३८ लाखांचा सीमेंट साठवण बंधारा बांधला जाणार आहे. नुक्ती येथे आणखी दोन सिमेन्ट नाला बंधारा व खोलीकरण केले जाणार आहे. त्यासाठी ४४ लाखांचा निदी मंजूर झाला. या सर्व कामांचे भूमिपूजन होऊन काम सुरू झाले आहे. या नदी पुनर्जीवन कार्यक्रमात एफईएस संस्था व सत्यजित जेना यांचे सहकार्य लाभल्याचे आमदार प्रा.तोडसाम यांनी सांगितले. त्यामुळे येत्या वर्षात वाघाडी नदी पुनर्जीवित होण्याचा विवास त्यांनी व्यक्त केला.
भूमिपूजन सोहळ्याला भाजपााचे मधुसूदन चोपडे, राजू शुक्ला, जीवन मुद्देलवार, गणेश चव्हाण, अजय रेड्डी एल्टीवार, अविनाश ठाकरे, विनय जाधव, जावेद भाई, विनोद प्रधान, किरण गोल्लीवार, अविनाश आनंदिवार, स्वप्नील मानकर, सरपंच आत्राम व गावकरी अपस्थित होते.