महागावात ४० गावांना जोडरस्ता दुरूस्तीची प्रतीक्षा
By Admin | Published: January 15, 2015 11:00 PM2015-01-15T23:00:13+5:302015-01-15T23:00:13+5:30
तालुका मुख्यालय आणि गावापासून हमरस्त्यावर येण्यासाठी रस्ता आहे. परंतु गेल्या कित्येक वर्षात त्यांची दुरुस्तीच झाली नाही. त्यावरून आता चालताही येत नाही. अशा एक-दोन नव्हे तब्बल
संजय भगत - महागाव
तालुका मुख्यालय आणि गावापासून हमरस्त्यावर येण्यासाठी रस्ता आहे. परंतु गेल्या कित्येक वर्षात त्यांची दुरुस्तीच झाली नाही. त्यावरून आता चालताही येत नाही. अशा एक-दोन नव्हे तब्बल ४० गावांतील जोडरस्त्यांना दुरूस्तीची प्रतीक्षा आहे. मात्र जिल्हा परिषद बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.
तालुक्याच्या नकाशावर असूनही थार, अनंतवाडी या गावांना अद्यापही रस्ता नाही. ही गावे अजूनही दुर्लक्षित आहे. थार येथे रस्ता देण्याची मागणी जुनीच आहे. परंतु आतापर्यंत एकाही लोकप्रतिनिधीने ही समस्या सोडविली नाही. या गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. येथे टॅँकरने पाणी पुरविण्यात येते. रस्त्या अभावी टॅँकरसुद्धा गावात न्यायाचा कसा असा प्रश्न अद्यापही सुटला नाही. तालुक्यातील ग्रामीण भाग म्हणून दीडशे रस्ते जिल्हा परिषद बांधकाम विभाग तर उर्वरित हमरस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिनस्त आहेत. दोन्ही विभागाने काही वर्षात केलेल्या कामाची चाळणी झाली असून, पोचरस्त्याचे मात्र खस्ता हाल झाले आहेत.
तालक्यातील घाणमुख, पिंपळगाव, काळी, टेंभी, बिजोरा, कोठारी उटी, तेलतवाडी, मोरथ, उटी ते गौळ रस्त्यावरील पुलाचे बांधकाम, वेणी धरण, हिवरा थार संगम, चिलगव्हाण, पोहंडळू, ईजनी ते दार्देवाडी, पोखरी, पेढी, मोहदी, माळवागद, हिवरदरी, कारंजखेड जुने, वाघनाथ, पिंपळवाडी तांडा, कोठारी, बेलदरी, नांदगव्हाण, बोथा, मोरथ, लेवा, अंबोडा, कलगाव, सवना ते वेणी, मुडाणा ते साधुनगर, वडद, हिंगणी ते पापलवाडी, धारेगाव, टेंभूरदरा, कमळवेणी, बारभाई तांडा आणि बरगेवाडी या चाळीस गावच्या पोच रस्त्याला दुरूस्तीची प्रतीक्षा आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या आगामी बैठकीत महागाव तालुक्यातील पोच रस्ते मार्गी लागतील अशी या गावच्या प्रत्येक नागरिकांना अपेक्षा आहे.
(शहर प्रतिनिधी)