घुग्घूसच्या वर्धा नदीची वाळू वणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 10:14 PM2019-01-02T22:14:08+5:302019-01-02T22:14:38+5:30

एकीकडे रेती घाटांचा लिलाव न झाल्याने रेतीअभावी बांधकामे प्रभावित झाली असताना दुसरीकडे घुग्घूस (जि.चंद्रपूर) येथील वाळू तस्कर मोठ्या प्रमाणावर वणीत रेतीचा अवैधरित्या पुरवठा करित असल्याची बाब समोर आली आहे.

Wang river of Wardha river in the valley | घुग्घूसच्या वर्धा नदीची वाळू वणीत

घुग्घूसच्या वर्धा नदीची वाळू वणीत

Next
ठळक मुद्देमहसूल विभागाने केला पर्दाफाश : रात्रीच्या काळोखात होते रेतीची वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : एकीकडे रेती घाटांचा लिलाव न झाल्याने रेतीअभावी बांधकामे प्रभावित झाली असताना दुसरीकडे घुग्घूस (जि.चंद्रपूर) येथील वाळू तस्कर मोठ्या प्रमाणावर वणीत रेतीचा अवैधरित्या पुरवठा करित असल्याची बाब समोर आली आहे. रात्रीच्या काळोखात घुग्घूस येथून वणीत टिप्पर, ट्रक, ट्रॅक्टर आदी वाहनातून मोठ्या प्रमाणावर रेती वणीत आणली जात आहे.
दरम्यान, बुधवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास वणी महसूल विभागाच्या विशेष पथकाने वणी-घुग्घूस मार्गावर रेतीची अवैध वाहतूक करणारे टिप्पर पकडून कारवाई केली. या टिप्परमध्ये तब्बल चार ब्रास रेती होती. तहसीलदार श्याम धनमने यांनी रेतीमाफिया मोबिन शेख याला दोन लाख ६० हजार रूपयांचा दंड ठोठावला.
बुधवारी मध्यरात्रीनंतर रेतीने भरलेला टिप्पर वणीकडे येत असल्याची गोपनिय माहिती तहसीलदार श्याम धनमने यांना मिळाल्यानंतर त्यांनी यासंदर्भात गठीत केलेल्या विशेष पथकाला टिप्परवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्वत: श्याम धनमने, नायब तहसीलदार देवेंद्र वासनिक, वैभव पवार, मंडळ अधिकारी अरूण मडावी, गजानन देठे, तलाठी दत्ता तुपे, किशोर इरूटकर, सुनील उराडे, राहुल माहुरे, चंदू मसराम यांनी बुधवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास कडाक्याच्या थंडीत सापळा रचला. घुग्घूसकडून येत असलेल्या एका टिप्परला अडविले. तपासणी केली असता, त्यात रेती आढळून आली. लगेच सदर टिप्पर ताब्यात घेण्यात आला. या कारवाईने वाळू तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
तस्करांनी नेमले गुप्तहेर
महसूल विभागाने वाळू तस्करी थांबविण्यासाठी विशेष पथक गठित केल्यानंतर या पथकावर ‘वॉच’ ठेवण्यासाठी तस्करांनी ५०० ते एक हजार रुपये रोजाने गुप्तहेर नेमले आहेत. हे गुप्तहेर पथकाच्या मागावर राहत असल्याची माहिती आहे. त्यातून तस्करांना पथकाच्या हालचाली कळत आहे.
 

Web Title: Wang river of Wardha river in the valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.