‘माणुसकीच्या भिंती’तर्फे वंचितांची दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:28 PM2017-10-24T23:28:57+5:302017-10-24T23:29:08+5:30
मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ब्रीद घेवून पुसद येथील शनि मंदिराजवळ उभारलेल्या माणुसकीच्या भिंतीतर्फे वंचितांसाठी दिवाळी भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ब्रीद घेवून पुसद येथील शनि मंदिराजवळ उभारलेल्या माणुसकीच्या भिंतीतर्फे वंचितांसाठी दिवाळी भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनाथ मुलांना धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन कपडे देवून त्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सहायक पोलीस निरीक्षक गोपाल जाधव, बालाजी कामिनवार, राहुल गायकवाड यांच्या हस्ते माणुसकीच्या भिंतीची पूजा करण्यात आली. त्यानंतर अनाथ मुलांना नवीन कपडे वितरीत करण्यात आले. तसेच फराळाचे साहित्यही देण्यात आले. या उपक्रमामुळे अनाथांच्या चेहºयावर हास्य झळकले. विशेष म्हणजे माणुसकीच्या भिंतीमुळे रोज अनेकांना कपडे व इतर वस्तू मिळतात. परंतु दिवाळीच्या काळात नवीन कपडे देण्याचा हा आगळावेगळा उपक्रम पार पडला.
यावेळी गजानन जाधव, मधुकर वाळुकर, प्रल्हाद गुहाडे, प्रभाकर पाटील, रामदास सानप, जगत रावल, अमोल मोरे, बालाजी बंडेवार, आकाश शिंदे, सैयद रोशन, पंजाब ढेकळे, नितीन शेवाळकर, सुशांत महल्ले, संतोष गायकवाड, दत्तात्रय जाधव, मराठा युवा मंचचे शंकर गावंडे, सचिन भिताडे, मारोती काळे, राहुल धोतरकर, प्रतीक चव्हाण, सचिन सुरोसे, गोपाल सुरोसे, अवनेश वाळूकर, आदित्य जाधव, सुभाष राठोड, जय उंटवाल, गिरिष अनंतवार, विजय खंदारे, संजय देशकरी, राजाराम बहादुरे आदी उपस्थित होते. संचालन सुशांत महल्ले यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.