पुसद येथे वारकऱ्यांनी भजनाने केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:29 AM2021-07-18T04:29:37+5:302021-07-18T04:29:37+5:30
पुसद : विश्व हिंदू परिषद व वारकरी संप्रदायाच्यावतीने शनिवारी वारकरी संप्रदायावर दाखल गुन्हे मागे घ्यावे, वारीला ५०० वारकऱ्यांसोबत परवानगी ...
पुसद : विश्व हिंदू परिषद व वारकरी संप्रदायाच्यावतीने शनिवारी वारकरी संप्रदायावर दाखल गुन्हे मागे घ्यावे, वारीला ५०० वारकऱ्यांसोबत परवानगी द्यावी, आदी मागण्यांसाठी तहसीलसमोर भजन आंदोलन करण्यात आले.
सरकार धार्मिक कार्यक्रमांना का परवानगी देत नाही, असा सवाल करीत वारकऱ्यांनी भजनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध केला. कित्येक वर्षांपासून पंढरीची वारी अखंडित सुरू आहे. मागील वर्षी कोरोनाचे थैमान असल्यामुळे वारकऱ्यांनी पालखी रद्द केली होती. यावर्षी कोरोनाचे प्रमाण कमी असल्यामुळे वारी तसेच मंदिरामध्ये होणाऱ्या दैनंदिन कार्यक्रमास परवानगी द्यावी, अशी मागणी वारकऱ्यांनी यावेळी केली.
विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री बालाजी कामीनवार, जिल्हाध्यक्ष भारत पेन्शनवार, नगर मंत्री हरीश चौधरी, वासंती सरनाईक, सुनीता तागलपलेवर, कांचन पाटील, कल्पना वाघमारे, किरण देशपांडे, सूचिता तांबेकर,
वारकरी संप्रदायातर्फे नारायण महाराज, भारत महाराज, अशोक महाराज, बाळू महाराज डाके, महेंद्र महाराज, पंडित महाराज शिंदे, बबन महाराज पारध, मांगीलाल महाराज, वैष्णव महाराज, केशव महाराज, उत्तम महाराज, मोरे महाराज, संतोष महाराज, गणेश महाराज, अजिंक्य महाराज, कमलाकर महाराज, शिंदे महाराज, भास्कर महाराज, परवीन महाराज, तसेच बजरंग दलातर्फे अरुण मोटे, आर्यन भालेकर, वैष्णव ढोकणे व अनेक वारकरी आंदोलनात सहभागी होते. सांगता नारायण महाराज हर्षिकर यांनी केली.