पुलाच्या कामाने रोखले वर्धा नदीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:52 PM2019-05-10T23:52:36+5:302019-05-10T23:53:30+5:30

शहराला शिरपूर येथील वर्धा नदीतून पाणीपुरवठा होतो. परंतु याठिकाणी पूल बनविणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीने वर्धा नदीचे पाणी अडविले. पाणीपुरवठ्याच्या विहिरीची पातळी अतिशय खालावली आहे. परिणामी कळंब शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

Wardha river water prevented by bridge work | पुलाच्या कामाने रोखले वर्धा नदीचे पाणी

पुलाच्या कामाने रोखले वर्धा नदीचे पाणी

Next
ठळक मुद्देआमदारांची तक्रार : कळंब शहरातील पाणीप्रश्न झाला गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : शहराला शिरपूर येथील वर्धा नदीतूनपाणीपुरवठा होतो. परंतु याठिकाणी पूल बनविणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीने वर्धा नदीचेपाणी अडविले. पाणीपुरवठ्याच्या विहिरीची पातळी अतिशय खालावली आहे. परिणामी कळंब शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या विषयीची तक्रार आमदार डॉ.अशोक उईके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
आमदार डॉ.अशोक उईके यांनी शुक्रवारी पदाधिकारी व अधिकाºयांना घेऊन शिरपूर येथील पाणी पुरवठ्याच्या विहिरीची पाहणी केली. तेथील प्रकार धक्कादायक होता. रस्ता आणि रेल्वे लाईन बनविणाºया कंपनीने नदीचे पाणी अडविले. त्यामुळे विहिरीची पातळी खालावली. तालुका प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे डॉ.उईके यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करुन कारवाई करण्याची मागणी केली.
कळंब शहरासह तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. यावर तातडीने उपाय करण्यासाठी आणि पाण्याचे नियोजन करण्यासाठी आज आमदार प्राचार्य डॉ.अशोक उईके यांनी पाणीटंचाईचा आढावा घेतला. शहरातील गायसागर व चक्रवती नदीवरील पाणीपुरवठा विहिरीची पाहणी केली.
यावेळी नगराध्यक्ष सुनीता डेगमवार, उपनगराध्यक्ष मनोज काळे, नायब तहसीलदार राजेश कहारे, बावणे, मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास बोंद्रे, नगरसेवक मारोती दिवे, वासुदेव दाभेकर, मुन्ना लाखीया, निखिल गोधनकर, अवी वेलके उपस्थित होते.

Web Title: Wardha river water prevented by bridge work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.