दोन वर्षांपासून पगार न दिल्याने उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:43 AM2021-07-27T04:43:55+5:302021-07-27T04:43:55+5:30

सन २०१४पासून ए. सी. सी. चांदा सिमेंट कंपनीत सेफ्टी पेट्रोलर म्हणून काम केले. पूर्वी त्यांचा दरमहिन्याला पगार होत होता. ...

Warning of not paying salary for two years | दोन वर्षांपासून पगार न दिल्याने उपोषणाचा इशारा

दोन वर्षांपासून पगार न दिल्याने उपोषणाचा इशारा

Next

सन २०१४पासून ए. सी. सी. चांदा सिमेंट कंपनीत सेफ्टी पेट्रोलर म्हणून काम केले. पूर्वी त्यांचा दरमहिन्याला पगार होत होता. परंतु काही कालावधीतच अधिकाऱ्यांची बदली झाली. प्रभारी अधिकारी म्हणून अनिल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या कालावधीत पेंदोर यांचा चार महिन्यांचा पगार झालाच नाही. पगार काढण्यास सांगितले असता, त्यांनी अर्ज करण्यास सांगितले. त्यानुसार अर्ज करूनही पगार दिला नाही. उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप आहे. याबाबत पेंदोर यांनी केंद्रीय मंत्रालयाकडेही तक्रार केली. संतोष पेंदोर हा एसीसी माईनचा कर्मचारी असून, त्याला बी. एम. पी. एल.चा कर्मचारी दाखविल्याचा आरोप केला आहे. निवेदन व तक्रारी करूनही आता न्याय मिळत नसल्याने पेंदोर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.

Web Title: Warning of not paying salary for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.