रखवालदार शेतकरी बेपत्ता
By admin | Published: April 21, 2017 02:25 AM2017-04-21T02:25:40+5:302017-04-21T02:25:40+5:30
शेतातील भुईमुंगाचे वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी रात्रीच्यावेळी शेतात गेलेला तालुक्यातील पिंपळगाव येथील
महागाव : शेतातील भुईमुंगाचे वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी रात्रीच्यावेळी शेतात गेलेला तालुक्यातील पिंपळगाव येथील शेतकरी गत आठ दिवसांपासून बेपत्ता आहे. पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तालुक्यातील पिंपळगाव सूतगिरणीतील दादाराव पवार हा गावालगतच्या शेतात रखवालीसाठी गेला होता. तो आठ दिवसांपूर्वी घरून रात्री १० वाजताच्या सुमारास निघून गेला. गावालगत शेती असल्याने ते मचानावर रात्री झोपले होते. त्या रात्री कुत्र्यांचा भुंकण्याचा जोरदार आवाज झाला. गावकरी या प्रकाराने या शेताकडे धावले. त्यावेळी चार ते पाच अनोळखी तरुण त्याला ओढत नेत असल्याचे दिसल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. गत आठ दिवसांपासून दादारावचा कोणताही थांगपत्ता लागला नाही. पत्नीने पुसद ग्रामीण ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.