यवतमाळात साकारणार देखणे वनउद्यान

By admin | Published: August 3, 2016 01:28 AM2016-08-03T01:28:29+5:302016-08-03T01:28:29+5:30

जैव वैविधता आणि प्राचीन संस्कृतीने नटलेल्या निसर्गसंपन्न यवतमाळच्या वैभवात देखण्या वनउद्यानाने भर पडणार आहे.

Watching forests in Yavatmal | यवतमाळात साकारणार देखणे वनउद्यान

यवतमाळात साकारणार देखणे वनउद्यान

Next

निसर्ग पर्यटनाची संधी : जांब रोडवर ३५ हेक्टरवर निसर्ग आणि पर्यटनाचा सुंदर मेळ
सुरेंद्र राऊत यवतमाळ
जैव वैविधता आणि प्राचीन संस्कृतीने नटलेल्या निसर्गसंपन्न यवतमाळच्या वैभवात देखण्या वनउद्यानाने भर पडणार आहे. येथील जांब रोडवरील वनविभागाच्या ३५ हेक्टर क्षेत्रात लवकरच वनउद्यान साकारले जाणार असून, वनसंपदा, निसर्ग आणि पर्यटन याचा येथे सुंदर मेळ घातला जाणार आहे.
यवतमाळ जिल्हा हा वनश्रीने नटलेला आहे. परंतु यवतमाळ शहरात मात्र नागरिकांसाठी विरंगुळ््याचे कोणतेही ठिकाण नाही. नैसर्गिकदृष्ट्या पर्यटनस्थळाची स्थिती असलेल्या यवतमाळच्या सौंदर्यात या वनउद्यानाने भर घातली जाणार आहे. यवतमाळ शहरापासून अगदी जवळ जांब रोडवर हे वनउद्यान साकारले जात आहे. शासनाने २०१५-१६ मध्ये वनक्षेत्र पर्यटनस्थळ विकासांतर्गत वनजमिनीचा सर्वांगिण विकास करण्याचे ठरविले आहे. त्यानुसारच निसर्ग पर्यटनस्थळ विकसित केले जाणार आहे. येथे पर्यावरण पूरक व्यवस्था, वन व वन्यप्राणी विषयक सामुग्री, दृकश्राव्य सामुग्री, निसर्गप्रेमी आणि अभ्यासकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासोबतच पाच किलोमीटरचा वॉकिंगट्रॅक हे या वनउद्यानाचे खास वैशिष्ट्य राहणार आहे. या वनउद्यानाच्या चारही बाजुला चार किलोमीटर लांबीची संरक्षक भिंत आणि दोन प्रवेशव्दार उभारले जाणार आहे. वनउद्यानातून वाहणाऱ्या नाल्याचा वापर वनउद्यानाचे सौंदर्य वाढविण्यासाठी केला जाणार आहे. या वनउद्यानात लहान मुलांच्या खेळाण्यासाठी आणि निसर्गअभ्यासासाठी विशेष सुविधा उपलब्ध केल्या जातील. उद्यानात कमळ तलाव आणि इतर प्रजातींच्या वेली टाकून तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात येईल. याठिकाणी पक्षीथांबा निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच लगतच पक्षीनिरीक्षण कुटी आणि विश्रामगृहही राहणार आहे.
प्रस्तावित वनउद्यानात उद्यानासाठी तज्ज्ञ आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यक्तिंकडून पाहणी करण्यात आली. मुख्य वनसंरक्षक वसंत गुरमे, उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, मुख्य वनअभियंता भगत यांनी पाहणी करून वनउद्यान निर्मितीचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर मडावी यांनी विशेष पुढाकार घेतला. सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करून हे वनउद्यान शहराच्या दृष्टिकोणातून किती महत्वाचे आहे, हे शासनाला पटवून दिले. या उद्यानात वनौषधी वृक्ष, सदाहरित वृक्ष, रानफळांची वृक्ष आणि रस्त्याच्या दुतर्फा शोभिवंत झाडे लावली जाणार आहे.

Web Title: Watching forests in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.