जलवाहिनीच्या दुरुस्तीचे पितळ २४ तासात उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 09:50 PM2019-05-13T21:50:35+5:302019-05-13T21:50:57+5:30

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर फुटलेल्या जलवाहिनीने पुन्हा दगा दिला आहे. दुरुस्तीसाठी लावलेले रबर पॅकिंग योग्यरित्या बसविले गेले नाही. त्यामुळे या वाहिनीवरून होणारा पाणीपुरवठा पुन्हा काही दिवस विस्कळीत होण्याची शक्यता वाढली आहे.

Water corridor brass open in 24 hours | जलवाहिनीच्या दुरुस्तीचे पितळ २४ तासात उघडे

जलवाहिनीच्या दुरुस्तीचे पितळ २४ तासात उघडे

Next
ठळक मुद्देगोदणी रोडवरील प्रकार : रबर पॅकिंग तकलादू, पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर फुटलेल्या जलवाहिनीने पुन्हा दगा दिला आहे. दुरुस्तीसाठी लावलेले रबर पॅकिंग योग्यरित्या बसविले गेले नाही. त्यामुळे या वाहिनीवरून होणारा पाणीपुरवठा पुन्हा काही दिवस विस्कळीत होण्याची शक्यता वाढली आहे.
भारत सरकारच्या महानेट प्रकल्पाचे काम करताना मजीप्राच्या मुख्य जलवाहिनीला मोठे छीद्र पडले. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे रस्त्यावरून लाखो लिटर पाणी वाहात गेले. याविषयी पोलिसात तक्रार करण्यात आली. जलवाहिनी दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेण्यात आले. मात्र याठिकाणी प्राधिकरण अधिकाऱ्यांचा अनुभवशून्यतेचा परिचय आला. जवळपास ३०० एमएमच्या या पाईपलाईनचे रबर पॅकिंग करण्यात आले. काम ओके झाल्याचा समज करत सोमवारी पाणीपुरवठ्यासाठी पाणी सोडण्यात आले. परंतु फुटलेल्या पाईपमधून पाणी वाहू लागल्याने पुरवठा बंद करण्यात आला.
सदर काम करताना सुरुवातीला खराब झालेला संपूर्ण भाग काढून टाकला जाणार होता. मात्र केवळ रबर पॅकिंगचा निर्णय घेण्यात आला. हाच प्राधिकरणाच्या अंगलट आला आहे. कित्येक वर्षांपासून या विभागात काम करणारे अभियंते आणि कंत्राटदारांना सदर काम कशा पद्धतीने केले जावे, हे कळू नये याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. या विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे दोन ठिकाणचा कारभार आहे. आठवड्यातून तीन दिवस ते यवतमाळला देतात. कामांमध्ये केवळ चालढकल सुरू आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी उपविभागाकडे असल्याने कार्यकारी अभियंते निश्चिंत असल्याचे सांगितले जाते. प्राधिकरणाकडून होत असलेली अनेक कामे निकृष्ट केली जात असल्याने समस्या वाढत असल्याची ओरड आहे.
साधारण कामासाठी तीन दिवस
महानेटच्या कामामुळे फुटलेली पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल तीन दिवस लावण्यात आले. केवळ ३०० एमएमची ही पाईपलाईन आहे. भविष्यात एक हजार एमएमची कामे या विभागाला करावी लागणार आहे. अशावेळी दुरुस्तीसाठी किती कालावधी खाणार हा चिंतायुक्त प्रश्न आहे. अमरावतीसारख्या ठिकाणी हजार एमएमची लाईन दुरुस्तीसाठी केवळ एक दिवस लागतो. यवतमाळात मात्र अनेक दिवस घेतात. अनुभवशून्य आणि चालढकल करणारे कंत्राटदार या विभागात आहेत. त्यामुळेच ही परिस्थिती उद्भवत आहे. विशेष म्हणजे, शहरातील छोट्या पाईपलाईन दुरुस्तीची कामे करणारा कंत्राटदार बेंबळाची एक हजार एमएमची पाईपलाईन टाकत आहे. कामे देताना प्राधिकरणाकडूनही योग्य व्यक्तीची निवड होत नसल्याचे स्पष्ट होते.

Web Title: Water corridor brass open in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.