दुष्काळमुक्तीसाठी वॉटर कप उत्तम पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 10:27 PM2018-08-05T22:27:34+5:302018-08-05T22:30:38+5:30
वातावरण आणि पर्यावरणातील बदलांमुळे भविष्यकाळ अत्यंत कठीण असल्याचे संकेत मिळत आहे. अशा स्थितीत दुष्काळमुक्त परिसरासाठी वॉटर कप स्पर्धा चांगला पर्याय ठरू शकतो, असा विश्वास महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : वातावरण आणि पर्यावरणातील बदलांमुळे भविष्यकाळ अत्यंत कठीण असल्याचे संकेत मिळत आहे. अशा स्थितीत दुष्काळमुक्त परिसरासाठी वॉटर कप स्पर्धा चांगला पर्याय ठरू शकतो, असा विश्वास महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला.
येथे पाणी फाउंडेशनतर्फे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या जलरत्नांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड, नगराध्यक्ष बबनराव इरवे, पी.बी. आडे, उपविभागीय वनाधिकारी गुजर, पंचायत समिती उपसभापती पंडित राठोड, गटविकास अधिकारी बी.एच. पाचपाटील, ठाणेदार रीता उईके, वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे, दत्तात्रय राहाणे, नायब तहसीलदार होटे, कृषी अधिकारी राजीव शिंदे उपस्थित होते.
संजय राठोड म्हणाले तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होणार, ही भविष्यवाणी खरी ठरते की काय, अशी स्थिती आहे. मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने श्रमदानाच्या माध्यमातून झालेले अशक्यप्राय काम नक्कीच दिलासा देणारे आहे. उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमात वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांतील नागरिक, विविध सामाजिक, व्यावसायिक, कर्मचारी संघटना, लोकप्रतिनिधी, पत्रकार, महिला, युवक मंडळे, विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्पर्धेत योगदान देणाºयांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. संचालन राजू कांबळे, प्रास्ताविक पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक संतोष गवळे, आभार तालुका समन्वयक पंकज चव्हाण यांनी मानले. यावेळी विविध संघटनांचे प्रतिनिधी, महिला, पुरुष, युवक उपस्थित होते.