खुनी नदीपात्रात आले हिरवेगावर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 09:48 PM2019-07-06T21:48:18+5:302019-07-06T21:48:44+5:30
जून महिना संपल्यानंतर २ जुलैला येथील कोरड्या पडलेल्या खुनी नदीत अचानक हिरव्या पाण्याचा प्रवाह वाहू लागल्याने नदीनजीकच्या गावकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेवाळामुळे पाण्याचा रंग हिरवा असल्याचे सर्वांना वाटले. मात्र पाणी गढूळ किंवा शेवाळयुक्त नसून स्वच्छ आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणबोरी : जून महिना संपल्यानंतर २ जुलैला येथील कोरड्या पडलेल्या खुनी नदीत अचानक हिरव्या पाण्याचा प्रवाह वाहू लागल्याने नदीनजीकच्या गावकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेवाळामुळे पाण्याचा रंग हिरवा असल्याचे सर्वांना वाटले. मात्र पाणी गढूळ किंवा शेवाळयुक्त नसून स्वच्छ आहे. पाणी स्वच्छ आहे, तर हिरवा रंग आला कसा, पाण्यात कोणते रसायन तर मिसळले नसावे, अशी शंका गावकºयांमध्ये आहे. नदीची पाहणी केली असता, पांढरकवडापासून केळापूर, मराठवाकडी, ढोकी, वारा-कवठा, पाटणबोरी, टाकळी, पिंपरी याठिकाणी पाण्याचा रंग हिरवा दिसून येत आहे. पिंपरी येथे नळाच्या पाण्याचा रंग हिरवा येत आहे. टाकळी या गावात पाणी हिरवे आल्याने तेथील ग्रामपंचायतीने पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले आहे. अहवाला आल्यानंतरच पाणी हिरवे कसे झाले, हे कळू शकणार आहे. सध्यास्थितीत गावकºयांना या पाण्याचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.