पाणपोईचा धर्म झाला आता बाटली‘बंद’

By admin | Published: March 22, 2017 12:09 AM2017-03-22T00:09:26+5:302017-03-22T00:09:26+5:30

तहानलेल्यांची तृष्णाशांती करण्याएवढा धर्म नाही. म्हणूनच उन्हाळा आला की, ठिकठिकाणी पाणपोई लावली जाते. पुसद शहरही त्याला अपवाद नाही.

Water has become the religion of bottle 'band' | पाणपोईचा धर्म झाला आता बाटली‘बंद’

पाणपोईचा धर्म झाला आता बाटली‘बंद’

Next

विकतचे पाणी : सामाजिक संघटनांच्या पुढाकाराची गरज
पुसद : तहानलेल्यांची तृष्णाशांती करण्याएवढा धर्म नाही. म्हणूनच उन्हाळा आला की, ठिकठिकाणी पाणपोई लावली जाते. पुसद शहरही त्याला अपवाद नाही. दरवर्षी सामाजिक संघटना आणि दानशूर मंडळी पाणपोई सुरू करतात. परंतु अलिकडे पाण्याचा व्यापार सुरू झाला आणि पाणपोईचा धर्म बाटली‘बंद’ झाला.
अंगाची काहिली करणाऱ्या उन्हात प्रत्येकाला पाण्याची गरज भासते. पुसद शहरात बाहेरगावहून येणाऱ्या नागरिकांना पाण्याची ही गरज अधिक असते. त्यामुळे उन्हाळ््याच्या दिवसात शहरात ठिकठिकाणी पानपोई लावल्या जात होत्या. कुठे रांजन तर कुठे कायमस्वरुपी पानपोया उभारल्या आहेत. यासाठी शहरातील सामाजिक संघटना आणि दानशूर व्यक्ती पुढाकारही घेतात. दरवर्षी बसस्थानकासमोर, शिवाजी चौक, सुभाष चौक, मेन लाईन, श्रीरामपूर परिसरात पाणपोई लावली जाते. यावर ग्रामीण भागातून आलेले नागरिक आपली तहान भागवितात परंतु यंदा उन्हळ््याची चाहुल लागली तरी अपवाद वगळता कुठेही पाणपोई दिसत नाही.
सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण असलेल्या बसस्थानकावर तीन पाणपोई आहेत. त्यातील कामगार संघटनेची पाणपोई कायमची बंद आहे. बसस्थानकाच्या प्लॅटफार्मजवळ असलेल्या पाणपोईचाही उपयोग नागरिक घेत नाहीत. तर तिसऱ्या पाणपोईची योग्य देखभाल दिसत नाही. शिवाजी चौक आणि मेन लाईनमध्येही अद्यापपर्यंत पाणपोई सुरू झालेली नाही. तसेच शहराच्या इतर भागातही कुठे अपवाद वगळता पाणपोई नाही. परिणामी नागरिकांना विकतचे पाणी प्यावे लागत आहे. अलिकडे पाण्याचा व्यापार जोरात सुरू आहे. पाऊच आणि बाटलीबंद पाणी सहज उपलब्ध होते. दोन रुपयांच्या पाऊचपासून वीस रुपयांच्या बॉटलपर्यंत पाणी विकत घ्यावे लागते. परंतु ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची विकतचे पाणी घेण्याची मानसिकता नसते. त्यामुळे ही मंडळी शहरातील हॉटेल, टपरीचा आधार घेतात. परंतु त्या ठिकाणीही काही विकत घेतल्याशिवाय पाणीच मिळत नाही. अनेकदा दुकानदाराकडेच पाण्याची मागणी करावी लागते. यामुळे भर उन्हात व्याकुळ झालेले नागरिक पाण्याच्या एका घोटासाठी भटकंती करताना दिसतात.
(कार्यालय चमू)

Web Title: Water has become the religion of bottle 'band'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.