महावितरणच्या प्रतापाने हरभरा पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 10:21 PM2019-01-05T22:21:53+5:302019-01-05T22:22:30+5:30
जिल्ह्यात दुष्काळ असताना शेतकरी स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. मात्र तालुक्यातील ढाणकी व साखरा केंद्रावरून अनियमित वीज परवठा होत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेकडो हेरटवरील हरभरा पाण्यात सापडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : जिल्ह्यात दुष्काळ असताना शेतकरी स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. मात्र तालुक्यातील ढाणकी व साखरा केंद्रावरून अनियमित वीज परवठा होत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेकडो हेरटवरील हरभरा पाण्यात सापडला.
अस्मानी संकटासह जाणीवपूर्वक दिल्या जाणाऱ्या सुलतानी संकटामुळे श९तकरी त्रस्त आहे. यातून अन्नदात्याचे अस्तित्वच नष्ट होण्याची शक्यता बळावली आहे. ढाणकी, साखरा येथील वीज केंद्रावरून पुरवठा होणाऱ्या गावातील शेतकरी अडचणीत सापडले आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता पुरवठ्याचे वेळापत्रक बदलले जाते. यातून अवेळी आलेल्या विजेमुळे रात्रभर मोटरपंप सुरू राहिल्याने शेकडो हेक्टरवरील हरभरा पाण्याखाली गेला.
या संदर्भात विचारणा करण्यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाºयाशी संपर्क साधला असता ढाणकी व साखरा येथील दोन्ही केंद्रांच्या जबाबदार अभियंत्यांनी उत्तर दिले नाही. त्यांनी मुजोरी कायम ठेवली. या दोन्ही केंद्रावरून सातत्याने शेतकऱ्यांना मानासिक त्रास दिला जात असल्याचा आरोप त्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. या परिसरात वीज कपात नियमांतर्गत शेतीसाठी केवळ ८ तास वीज पुरवठा केला जातो. मात्र हा पुरवठा कमी दाबाचा असतो. बहुतांश शेतकºयांनी या खंडित वीज समस्येमुळे मोटरपंपास आॅटो स्विच बसविले. मात्र कधीही वीज येत असल्याने संपूर्ण शेत पाण्याखाली जात आहे.
आॅटो स्वीचमुळे शेतात साचले पाणी
चातारी-मानकेश्वर फिडरवर सोमवार ते गुरुवार, शुक्रवार ते रविवार या काळात वेगवेगळ्या वेळी वुज पुरवठा होतो. मात्र वेळापत्रकाबाबत पूर्वसूचना न देताच अचानक बदल केला जातो. गुरुवार, ३ जानेवारीला १0.३0 पासून ते सकाळी ८.३0 वाजतापर्यंत तीन फेज वीज पुरवठा सुरू होता. निश्चित वेळापत्रकानुसार शेतकऱ्यांनी ओलिताचे नियोजन केले होते. मात्र महावितरणने अचानक केलेल्या वीज पुरवठ्याने आॅटो स्विचमुळे रात्रीच मोटरपंप सुरू झाले अन् शेतात सर्वत्र पाणीच पाणी पसरले. यामुळे अनेक शेतकºयांच्या हरबरा, गहु, ज्वारी, ऊस पिकात पाणी साचले. शिवाय लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. संबंधित लाईनमनलाही या बदलाची माहिती नव्हती. सहाय्यक अभियंता नाईक यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली.