टीडीआरएफ जवानांकडून पशु, पक्ष्यांसाठी पाणपोई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:45 AM2021-05-20T04:45:24+5:302021-05-20T04:45:24+5:30
नागरी सुरक्षेसोबतच प्राणी व पशू, पक्ष्यांच्या संरक्षणार्थ जवान सदैव तत्पर असतात, असे संचालक हरिश्चंद्र राठोड यांनी सांगितले. आपत्ती व्यवस्थापन ...
नागरी सुरक्षेसोबतच प्राणी व पशू, पक्ष्यांच्या संरक्षणार्थ जवान सदैव तत्पर असतात, असे संचालक हरिश्चंद्र राठोड यांनी सांगितले. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करताना संघटनेला १६ वर्षे पूर्ण झाली. दरवर्षी वर्धापनदिन सर्व जवान एकत्रित येऊन साजरा करतात. परंतु, यावर्षी कोरोनामुळे एकत्रित येणे शक्य नव्हते. त्यामुळे सर्वांनी आपापल्या तालुक्यामध्ये विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून वर्धापनदिन साजरा केला.
तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात वर्धापनदिनानिमित्त हरिश्चंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात घाटंजी कंपनीतील टीडीआरएफ जवानांनी विविध ठिकाणी पशू, पक्ष्यांसाठी १०० पाणपोई तयार केल्या. तसेच ५० वृक्षांचे रोपण केले. घरातील टाकाऊ पिंप वापरून सर्व पाणपोई तयार केल्या. या उपक्रमासाठी अभिषेक राजहंस कार्यरत होते. या उपक्रमात श्रद्धा बोढाले, गणेश शेंडे, रोहित तेलंगे, गोविंद चौधरी, राजेश मोहुर्ले, राहुल सलाम, शुभम गोलकुंडवार, सूरज देवधरे, धीरज देवधरे, किशोर खटाळे, सागर खटाळे, आदी या सहभागी झाले होते.