घाटंजी तालुक्यातील ५० गावांत जलक्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 09:39 PM2019-04-17T21:39:29+5:302019-04-17T21:39:49+5:30

पाणी फाउंडेशनपुरस्कृत सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत तालुक्यातील ५० गावे दुष्काळावर मात करण्यासाठी सहभागी झाली आहे. स्पर्धची सुरुवात ८ एप्रिलच्या पहील्याच ठोक्याला रात्री १२ वाजून एक मिनिटाने श्रमदानाचा बिगुल वाजवून करण्यात आली.

Water revolution in 50 villages of Ghatanji taluka | घाटंजी तालुक्यातील ५० गावांत जलक्रांती

घाटंजी तालुक्यातील ५० गावांत जलक्रांती

Next
ठळक मुद्देतुफान आलंया : वाटर कप स्पर्धेला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : पाणी फाउंडेशनपुरस्कृत सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत तालुक्यातील ५० गावे दुष्काळावर मात करण्यासाठी सहभागी झाली आहे. स्पर्धची सुरुवात ८ एप्रिलच्या पहील्याच ठोक्याला रात्री १२ वाजून एक मिनिटाने श्रमदानाचा बिगुल वाजवून करण्यात आली. कुठे सलग समतल चर (सीसीटी), अनघड दगडी बांध (एलबीएस), तर कुठे शोषखड्डे खोदून स्पर्धेची सुरुवात झाली. काही गावांनी वृक्ष संवर्धनाकरिता खड्डे खोदून स्पर्धेची सुरूवात केली.
तालुक्यातील अनेक गावांनी दुष्काळावर मात करण्यासाठी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्पर्धेच्या सुरूवातीचा क्षण अन् क्षण त्यांच्यासाठी महत्वाचा असल्याचे दर्शविण्यासाठी पहिल्याच रात्री पहिल्या मिनिटाला विविध कामांची सुरूवात करण्यात आली. पांढुर्णा खु, रामपूर, उंदरणी, कापसी, चांदापूर, खापरी, कालेश्वर, मांडवा, बोधडी, भांबोरा, शिरोली, ससाणी आदी गावांनी स्पर्धेत सक्रिय सहभाग नोंदवून दुष्काळाशी दोन हात करत जलसंधारणाच्या कामांना सुरुवात केली.
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत तालुक्यात जल चळवळ उभी करणे व एवढ्या उत्साहाने चळवळीची सुरुवात होणे, यात पाणी फाउंडेशनच्या चमूचे कष्टही महत्त्वाचे ठरले आहे.
अनेक गावांनी स्पर्धेपूर्वी करता येणारी कामे पूर्ण केली असून आता तत्परतेने गावकरी श्रमदानाला लागले आहे. आपल्या धकाधकीच्या कामातून सकाळ व सायंकाळी वेळ काढून गाव पाणीदार करण्यासाठी सर्वांची धडपड सुरू झाली आहे.
ग्रामस्थांमध्ये उत्साह
आपले गाव पाणीदार करण्यासाठी गावकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेची एवढी जोरदार सुरूवात व गावकऱ्यांचा उत्साह अविश्वसनीय वाटत आहे. श्रमदात्यांचे हजारो हात झटत असल्याने तालुक्यात जलक्रांतीची सुरूवात होत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Water revolution in 50 villages of Ghatanji taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.