निर्गुडा नदीत पाणीच पाणी...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 10:23 PM2018-03-03T22:23:04+5:302018-03-03T22:23:13+5:30
एक महिन्यापूर्वी वाळवंट झालेल्या निर्गुडा नदीत राजूर खाणीचे पाणी सोडण्यात आल्यानंतर होळीचा सण लक्षात घेऊन नवरगाव धरणातूनही निर्गुडेत पाणी सोडण्यात आले.
ऑनलाईन लोकमत
वणी : एक महिन्यापूर्वी वाळवंट झालेल्या निर्गुडा नदीत राजूर खाणीचे पाणी सोडण्यात आल्यानंतर होळीचा सण लक्षात घेऊन नवरगाव धरणातूनही निर्गुडेत पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीतील जलसाठ्यात कमालिची वाढ झाली आहे. मात्र योग्य नियोजनाअभावी हे पाणी बंधाºयावरून वाहून जात असल्याचे दिसून आले. यासाठी पालिकेने नियोजन करून पाणी अडवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्हाधिकाºयांनी आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार बुधवारी २८ फेब्रुवारीला नवरगाव धरणातून ०.२२ दलघमी पाणी सोडण्यात येणार होते. मात्र होळीचा सण लक्षात घेऊन २७ फेब्रुवारीलाच नवरगाव धरणातून पाणी सोडण्यात आले. हे पाणी होळीच्या दिवशी वणीत पोहचले. तत्पूर्वी राजूर खाणीतून सोडण्यात आलेल्या पाण्याचाही साठा नदीत होता. त्यात नवरगाव धरणातून पाणी सोडण्यात आल्याने जलसाठ्यात कमालिची वाढ झाली. मात्र नदीवर आवश्यक असा बंधारा नसल्याने हे पाणी बंधाऱ्यावरून पाणी वाहून पुढे जात होते. पाणी वितरणातही नियोजन नसल्याने होळीच्या दिवशी काही ठिकाणी दुपारी तर काही ठिकाणी रात्री पाण्याचे वितरण करण्यात आले. अनेक भागांना तर पाणी पुरवठाच झाला नाही. परिणाम संबंधित भागातील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर गरज भागवावी लागली. पाणी वितरणाचे नियोजन नसल्याने दिसून येत आहे.