पुसदच्या कानडे ले-आऊटमध्ये पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:44 AM2021-04-02T04:44:07+5:302021-04-02T04:44:07+5:30
पुसद : नगर परिषदेच्या हद्दीतील कानडे ले-आऊटमधील गल्ली नंबर २ मध्ये मागील ४ ते ५ वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या ...
पुसद : नगर परिषदेच्या हद्दीतील कानडे ले-आऊटमधील गल्ली नंबर २ मध्ये मागील ४ ते ५ वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट झाली आहे. याबाबत नागरिकांनी पालिकेला निवेदन देऊन मुबलक पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.
अनेकदा वॉर्डातील नगरसेवकांना या समस्येची माहिती देण्यात आली. निवेदन देऊनसुद्धा नगरसेवक व नगरपालिका लक्ष देत नाही. आता येत्या १४ एप्रिलपासून रमजानचा पवित्र महिना सुरू होत आहे. मात्र, पाण्याच्या समस्येमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन सदर गल्लीत राहणाऱ्या लोकांची समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
समस्या न सुटल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत मुख्याधिकारी व पाणीपुरवठा सभापती ॲड. उमाकांत पापीनवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अमजद खान, सैय्यद सिद्दिकोद्दीन, फिरोज खान, मिर्झा आदिल बेग, मोहम्मद जिब्रान, अमनतुल्लाह खान, शेख समीर, सैय्यद अजमत, शेख रहीम, शेख फारुक, अब्दुल रहेमान चव्हाण आदी उपस्थित होते.