वणीत नवरगाव धरणातून पाण्याचा अल्प विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 09:59 PM2018-01-29T21:59:21+5:302018-01-29T21:59:49+5:30

वणी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नवरगाव धरणातून शुक्रवारी निर्गुडा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले खरे; परंतु हे पाणी वणीपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात पोहोचलेच नाही.

Water shortage from Navinagar dam in Vanni | वणीत नवरगाव धरणातून पाण्याचा अल्प विसर्ग

वणीत नवरगाव धरणातून पाण्याचा अल्प विसर्ग

Next
ठळक मुद्देचिंता वाढली : शहरातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर

आॅनलाईन लोकमत
वणी : वणी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नवरगाव धरणातून शुक्रवारी निर्गुडा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले खरे; परंतु हे पाणी वणीपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात पोहोचलेच नाही. सोमवारी सायंकाळी काही भागात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून बंद असलेला पाणी पुरवठा सुरळीत होईल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात पाच दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु ‘आडातच नाही, तर पोहºयात कुठून येईल’ या उक्तीचा अनुभव वणीकर घेत आहे. नदीत पाहिजे त्या प्रमाणात पाणीच नसल्याने त्याचा शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यावर्षी पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न पडल्याने सध्यस्थितीत नवरगाव धरणात केवळ ३३ टक्के म्हणजे ४.१८ दलघमी पाणी शिल्लक आहे. हे पाणी मेपर्यंत पुरावे, म्हणून जिल्हाधिकाºयांनी नवरगाव धरणातून दरमहा केवळ दोनवेळा पाणी सोडण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला केल्या आहेत. नवरगाव धरणातून वणीपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी पाईपलाईन नसल्याने धरणाचे पाणी निर्गुडा नदीच्या पात्रात सोडले जाते. शुक्रवारी सकाळी १० वाजता सदर धरणातून ००.१९ दलघमी पाणी सोडण्यात आले. शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होता.
पाणी सोडल्यानंतर वणीपर्यंत ते पोहोचण्यासाठी चार दिवस लागतात. त्यानुसार सोमवारी दुपारी निर्गुडा नदीच्या वणीतील पात्रापर्यंत पाणी पोहोचले खरे; परंतु त्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने पाणी पुरवठ्याचा प्रश्न जटील झाला आहे. पाण्याचे प्रमाण कमी असल्याने नदीवरील दोन पंपांपैकी एकाच पंपाचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे मंगळवारी होणारा पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आमदारांकडून वृत्ताची दखल
राजूर पिट्समधून येणारे पाणी हे पिण्यायोग्य असले तरी ते दूषित असल्याचा दावा नगरपालिकेकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात सोमवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सोमवारी सायंकाळी लालपुलिया भागातील राजूर पिट्सच्या तलाव व पाईपलाईनची पाहणी केली.

Web Title: Water shortage from Navinagar dam in Vanni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.