उमरखेड तालुक्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 09:48 PM2018-12-13T21:48:53+5:302018-12-13T21:49:14+5:30

हिवाळा सुरु असतानाच तालुक्यातील तब्बल ४३ गावात भीषण पाणीटंचाई सदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीपर्यंत आणखी अनेक गावचांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

Water shortage in Umarkhed taluka | उमरखेड तालुक्यात पाणीटंचाई

उमरखेड तालुक्यात पाणीटंचाई

Next
ठळक मुद्दे४३ गावे : आढावा बैठकीत ‘वास्तव’ उघड, उन्हाळ्यात समस्या वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : हिवाळा सुरु असतानाच तालुक्यातील तब्बल ४३ गावात भीषण पाणीटंचाई सदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीपर्यंत आणखी अनेक गावचांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
येथील जिजाऊ भवनात आमदार राजेंद्र नजरधने यांनी गुरूवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत पाणीटंचाईची दाहकता उघड झाली. यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने तालुक्यावरील दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. पंचायत समिती सभापती प्रवीण मिरासे, तहसीलदार भगवान कांबळे, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, राम देवसरकर, पंकज मुडे, पंचायत समिती सदस्य बालाजी आगलावे, प्रज्ञानंद खडसे, नयन पुद्दलवाड, गजानन सोळंके, सविता कदम, रमेश आडे, अरविंद माने यांच्यासह तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी, सरपंच, सचिव बैठकीला उपस्थित होते. या सवांनीच पाणीटंचाईची दाहकता स्पष्ट केली.
सध्या तालुक्यातील बोथा, ब्राम्हणगाव, मेट, बाळदी, चिंचोली (ढा.), चुरमुरा, धानोरा, दिघडी, दिंडाळा, गांजेगाव, हरदडा, हातला, करंजी, कोप्रा,मानकेश्वर, मन्याळी, मोरचंडी, मुळावा, मुरली, नारळी, अकोली, सावळेश्वर, बेलखेड, भवानी, बोरी वन, चिंचोली सं., नागेशवाडी, निंगणूर, पिंपळगाव वन, दिवटपिंप्री, सोईट घ., सोनदाबी, सोईट म., सुकळी (न.), ईसापूर, तरोडा, टेंभुरदरा, तिवडी, उंचवडद, विडूळ, वरूड बीबी अशा ४३ गावांत पाणीटंचाई सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. या गावातील सरपंच, सचिवांनी पाणीटंचाईवर उपाययोजना व प्रशासनाकडून होत असलेल्या अडचणीबाबत माहिती दिली. आमदारांनी उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. संचालन विस्तार अधिकारी संतोष डाखोरे, तर प्रास्ताविक धारपवार यांनी केले.
सांघिक प्रयत्नांची गरज
तालुका भीषण दुष्काळात सापडला असून शासनाने अनेक सवलती जाहीर केल्या. त्याचा लाभ घेत दुष्काळ निवारायचा आहे. त्यासाठी सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, सचिवांनी सांघिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे आमदार राजेंद्र नजरधने यांनी सांगितले. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Water shortage in Umarkhed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.