पूस धरणातील पाणीसाठा आटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 10:31 PM2018-03-31T22:31:47+5:302018-03-31T22:31:47+5:30

तालुक्याच्या दुर्गम व डोंगरी भागातील वनवार्लाजवळील पूस धरणातील पाणीसाठ दिवसेंदिवस कमी होत आहे. नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यावर मर्यादा असल्याने नदीच्या दुतर्फा शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना या पाणीटंचाईची झळ पोहोचू लागली आहे.

Water storage in Pus dam | पूस धरणातील पाणीसाठा आटला

पूस धरणातील पाणीसाठा आटला

googlenewsNext
ठळक मुद्देगाळ काढण्याची गरज : ४५ वर्षांपासून उपसा नाही, ४0 गावांवर पाणीसंकट

अखिलेश अग्रवाल।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : तालुक्याच्या दुर्गम व डोंगरी भागातील वनवार्लाजवळील पूस धरणातील पाणीसाठ दिवसेंदिवस कमी होत आहे. नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यावर मर्यादा असल्याने नदीच्या दुतर्फा शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना या पाणीटंचाईची झळ पोहोचू लागली आहे. गेल्या ४५ वर्षापासून या धरणातील गाळ न काढल्यामुळे धरणात पाणी कमी अन् गाळ जादा, अशी अवस्था झाली आहे.
पुसदपासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर वनवार्ला गावाजळ पूस धरण बांधण्यात आले. या धरणाला जवळपास ४५ वर्ष पूर्ण झाले आहे. तालुक्यातील तब्बल ४० गावांना या धरणाच्या पाण्याचा उपयोग होतो. पुसद परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीसह पुसद शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या धरणामुळे काही अंशी संपुष्टात आला आहे. पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने धरण भरल्यानंतर हिवाळ्यात धरणातील पाणी नदी पात्रात सोडून ते बंधाऱ्यात अडवून शेती व पिण्यासाठी देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र धरणातच पाणी कमी असल्याने नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे शेतकºयांना पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे.
यावर्षी सध्याच्या घटकेला धरणात केवळ १२ टक्के पाणीसाठ आहे. सध्या पुसदकरांना पालिका प्रशासन तीन दिवसाआड पाणी पुरवठा करीत आहे. यापुढे यात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. सध्या पूस धरणातील पाणीसाठी कमी झाल्याने धरणामध्ये गाळ किती आहे, ते दिसू लागले आहे. या धरणामध्ये भरमसाठ गाळ साचल्याने आपोआपच त्याची जल साठवण क्षमता कमी झाली आहे. पावसाळ्यात त्यामुळेच कमी पाऊस झाल्यावरदेखील धरण भरण्यास वेळ लागत नाही. परंतु गाळ हा धरण भरण्यातील मुख्य घटक आहे.
धरणामधील जलसाठ्यात वाढ होण्यासाठी पावसाळा सुरु होण्यापूर्वी हा गाळ काढण्याची गरज आहे. धरणातील गाळाचा उपसा केल्यास जलस्त्रोतांच्या मार्गातील अडथळा दूर होऊन जल साठवण क्षमतेत वाढ होऊ शकते. धरणातून काढण्यात आलेल्या गाळाचा उपयोग शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी करता येऊ शकतो. सध्या गाळ काढणे शक्य आहे. गाळ काढल्यास धरणाची जलक्षमता वाढून पुढील काही वर्षे तरी टंचाईपासून पुसदकरांची सुटका होऊ शकते.
तीन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई
पुसद शहर व परिसरातील ग्रामीण भागात दोन-तीन महिन्यांपासून पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. सध्या तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला. शहराला पाणी पुरवठा करणाºया उर्ध्व पूस धरणातील पाण्याचा साठ संपत आहे. धरणाची निर्मिती झाल्यापासून या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता कमी झाली आहे. येत्या काही वर्षात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी गाळ उपसावा, अशी मागणी बापू अणे स्मृती प्रतिष्ठानने जिल्हाधिकाºयांकडे केली.

Web Title: Water storage in Pus dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण