बोरगाव पुंजीत सरपंचाच्या वीटभट्टीला पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 10:42 PM2018-05-08T22:42:21+5:302018-05-08T22:42:21+5:30

उन्हाळ्यात गावामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना बोरगाव पुंजी येथील सरपंचाने पदाचा दुरूपयोग करीत स्वत:च्या विटभट्टीसाठी थेट गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहरीतून पाणी घेतले. या प्रकरणाची गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.

 Water supply to Borogaon Sarpanch's Veetbhatti | बोरगाव पुंजीत सरपंचाच्या वीटभट्टीला पाणीपुरवठा

बोरगाव पुंजीत सरपंचाच्या वीटभट्टीला पाणीपुरवठा

Next
ठळक मुद्देसार्वजनिक विहीर : गावकऱ्यांची मात्र पाण्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोलाबाजार : उन्हाळ्यात गावामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना बोरगाव पुंजी येथील सरपंचाने पदाचा दुरूपयोग करीत स्वत:च्या विटभट्टीसाठी थेट गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहरीतून पाणी घेतले. या प्रकरणाची गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.
बोरगाव पुंजी येथे गावातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावाला पाणी पुरवठ्याच्या विहिरीवरून नळयोजनेव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र सरपंचाने आपल्या पदाचा दुरुपयोग करून त्या विहिरीचे पाणी याच परिसरात असलेल्या स्वत:च्या विटभट्टीसाठी वापरणे सुरू केल्याचा आरोप नागरिकांनी केला. गावात मात्र पाण्याअभावी ग्रामस्थांचे हाल होत आहे.
गावातील पाण्याची समस्या सोडविण्याकरीता सरपंच यांच्या विटभट्टी कारखान्याला सुरू असलेला पाणी पुरवठा त्वरित बंद करण्यात यावा व सदर विहिरीवरून गावाला पाणी पुरवठा करावा, तसेच पदाचा दुरूपयोग करणाºया सरपंचावर कारवाई करावी, अशी मागणी बोरगाव पुंजी येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

भावाची विहीर अधिग्रहीत
सरपंचाने गावाला पाणी पुरवठा करण्याकरिता आपल्या बंधूच्या शेतातील विहीर अधिग्रहित केली. मात्र या अधिग्रहीत विहिरीवरून पाणी पुरवठा करण्यात येत नाही. नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे.

Web Title:  Water supply to Borogaon Sarpanch's Veetbhatti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.