राळेगाव शहराला मृत साठ्यातून पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 10:33 PM2019-06-21T22:33:28+5:302019-06-21T22:33:53+5:30

शहराचा पाणीपुरवठा आता कधीही ठप्प पडण्याची चिन्हे दिसून येत आहे. तूर्तास वर्धा नदी पात्रात कळमनेरजवळील डोहात केवळ ५० फूट रुंद आणि २५० फूट लांब व अडीच फूट खोल क्षेत्रातच पाणी शिल्लक आहे. याच मृत साठ्यातून पाणीपुरवठा केला जात आहे.

Water supply from dead stock in Ralegaon city | राळेगाव शहराला मृत साठ्यातून पाणीपुरवठा

राळेगाव शहराला मृत साठ्यातून पाणीपुरवठा

Next
ठळक मुद्देकळमनेर डोह : पुरवठा ठप्प पडण्याची चिन्हे

लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : शहराचा पाणीपुरवठा आता कधीही ठप्प पडण्याची चिन्हे दिसून येत आहे. तूर्तास वर्धा नदी पात्रात कळमनेरजवळील डोहात केवळ ५० फूट रुंद आणि २५० फूट लांब व अडीच फूट खोल क्षेत्रातच पाणी शिल्लक आहे. याच मृत साठ्यातून पाणीपुरवठा केला जात आहे.
शहरातील नागरिकांना मिळणारे पाणी चिखल, माती, गाळ व मातकट दुर्गंधीचे आहे. बेंबळा धरणाचे पाणी वर्धा नदीत सोडण्याची मागणी नगरपंचायतीने दीड महिन्यांपूर्वीच केली. बाभूळगाव व कळंब शहराकरिता बेंबळाचे पाणी वर्धा नदीत सोडले. मात्र राळेगावलाच वंचित का ठेवले, असा सवाल आहे.

Web Title: Water supply from dead stock in Ralegaon city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.