पेटूर, नायगावात टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 09:41 PM2018-04-05T21:41:34+5:302018-04-05T21:41:34+5:30

यंदाच्या मोसमात अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. जवळपास पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने नागरिकांची पाण्यासाठी दमछाक होत आहे.

Water supply to Petur, Naigata tanker | पेटूर, नायगावात टँकरने पाणीपुरवठा

पेटूर, नायगावात टँकरने पाणीपुरवठा

Next
ठळक मुद्देपाणी पेटले : नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव, सावंगीतही टँकरची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : यंदाच्या मोसमात अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. जवळपास पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने नागरिकांची पाण्यासाठी दमछाक होत आहे. परिस्थिती बिकट झाल्याने तालुक्यातील पेटूर व नायगाव (खु) या गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
अन्य गावांमध्येही पाण्याची बिकट अवस्था आहे. गावातील विहीरी व हातपंपांनी तळ गाठला आहे. परिणामी नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल सुरू आहेत. वणी येथून आठ किलोमिटरवर असलेल्या पेटूर गावात दरवर्षीच पाण्याची भीषण टंचाई निर्माण होते. तिच अवस्था नायगाव (खु.) येथील आहे. या दोनही गावांत दररोज टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. टँकरचे पाणी गावातील सार्वजनिक विहीरीत सोडले जाते. त्यानंतर गावकरी त्या पाण्याचा वापर करतात. पेटूरमध्ये दररोज २४ हजार लिटर क्षमतेचे पाण्याचे टँकर पाठविले जात आहे. नायगावातही तिच परिस्थिती आहे. गावात टँकर पोहचताच, पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडते. मात्र या टँकरच्या पाण्याने एक हजार ७२ लोकसंख्या असलेल्या या गावाची तहान भागत नाही. मिळालेल्या पाण्यात गरज भागली नाही, तर गावकऱ्यांना दूरवरील शेतातून पाणी आणून आपली गरज भागवावी लागत आहे.
वणी तालुक्यातील सावंगी (नवीन) येथेही पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून तेथेही टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसा प्रस्तावही वणी पंचायत समितीने वरिष्ठांकडे पाठविला आहे. तालुक्यातील कुर्ली, पिंपरी कायर, पेटूर व वरझडी बंडा या गावांमध्ये विहीरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तर तालुक्यातील गोपालपूर, तेजापूर व निंबाळा (बु.) येथे विहीरीचे अधिग्रहण करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.
पाणीपुरवठा उपविभागाची उदासीनता
गेल्या १५ वर्षांपासून पेटूर येथील नागरिक दर उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करतात. मागील आठवड्यात या गावातील महिलांनी गटविकास अधिकाºयांना घेराव घालून पाणी टंचाईचे निवारण करण्याची मागणी केली होती. पेटूर येथील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी मानकी येथे बोअर खोदण्यात आली. या बोअरवेलला मुबलक पाणी आहे. नळयोजनेच्या माध्यमातून या बोअरमधून पेटूर गावापर्यंत पाणी पोहचविण्याची जबाबदारी वणी येथील पाणी पुरवठा उपविभागाची आहे. मात्र बोअर तयार होऊन महिना लोटला असला तरी नळयोजनेचे काम सुरू करण्यात न आल्याने नागरिकांध्ये संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Water supply to Petur, Naigata tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी