वेडशी येथे आठ फुटांवर लागले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 10:02 PM2019-05-24T22:02:10+5:302019-05-24T22:02:48+5:30

तालुक्यात वाटर कप स्पर्धेचे यावर्षी तिसरे वर्ष सुरू आहे. या स्पर्धेअंतर्गत पाणीदार गावासाठी अ‘दान करताना वेडशी येथे अवघ्या आठ फुटांवर पाणी लागले. त्यामुळे या स्पर्धेचे यश आत्ताच दिसू लागले आहे. तालुक्यातील ४० गावांनी यावर्षी वाटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

Water at Vadodi at 8 feet | वेडशी येथे आठ फुटांवर लागले पाणी

वेडशी येथे आठ फुटांवर लागले पाणी

Next
ठळक मुद्देपाणीदार गाव : राळेगाव तालुक्यात वाटर कप स्पर्धेचे यश

लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : तालुक्यात वाटर कप स्पर्धेचे यावर्षी तिसरे वर्ष सुरू आहे. या स्पर्धेअंतर्गत पाणीदार गावासाठी अ‘दान करताना वेडशी येथे अवघ्या आठ फुटांवर पाणी लागले. त्यामुळे या स्पर्धेचे यश आत्ताच दिसू लागले आहे.
तालुक्यातील ४० गावांनी यावर्षी वाटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. पाणी फाउंडेशनच्या नेतृत्वात घेतला ग्रामस्थ आपापले गाव ‘पाणीदार’ करण्यासाठी मे ‘हिट’मध्येही घाम गाळून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. गावकऱ्यांना पाणी फाउंडेशनकडून आवश्यक ती मदत आणि मार्गदर्शन मिळत आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधीसुद्धा आपापल्या परिने गावागावांना भेट देऊन श्रमदान करून गावकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे.
वेडशी गावाने दोन वर्षांपूर्वी या स्पर्धेत भाग घेऊन तिसºया क्रमांकाचे पाच लाख रुपयांचे बक्षीस पटकाविले होते. या गावात मातीचे बांध, दगडी बांध, वृक्ष लागवड, विहीर पुनर्भरण, शेततळे, शोषखड्डे आदी कार्ये केली होती. आता या वर्षी २० गुणांचे काम पूर्ण केल्याने स्वयंसेवी संस्थेकडून एक लाख रुपयाचे बक्षीस मिळाले आहे. यावर्षी श्रमदान व मशीनने जलसंधारणाची कामे सुरू केली.
या गावात अर्धा किलोमीटर दूरवर दोन वर्षांपूर्वी कामे करण्यात आली होती. यावर्षी नाला खोलीकरण, रुंदीकरणाचे काम मशीनने केले. यात आश्चर्य म्हणजे भर मे महिन्यात अवघ्या आठ फुटांवर नाल्यात पाणीच पाणी आले. दोन वर्षांच्या कामांचा हा परिपाक असल्याचे सरपंच अंकुश मुनेश्वर यांनी सांगितले.

इचोरी, झाडगाव, धानोरात गावकरी सरसावले
शेवटच्या टोकावर असलेल्या इचोरीची लोकसंख्या अवघी १०० आहे. तेथे सर्व आबालवृद्ध श्रमदानासाठी सरसावले. गाव पाणीदार करण्याकरिता झपाटले. स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट देऊन श्रमदान केले. गटविकास अधिकारी रविकांत पवार व चमूने पूर्णवेळ श्रमदान करून तेथील युवकांचे मनोधैर्य वाढविले. तेथे रात्रीसुद्धा कामे सुरू आहे. झाडगावला दोन लाख रुपये मशीनीद्वारे काम करण्यासाठी मिळाल्याने तेथेही श्रमदानाने जोर धरला. धानोराच्या सरपंच सारिका ढाले, सचिव एम.आर. इंगोले व ग्रामस्थ यांनीही जोमाने कामाला सुरूवात केली.

Web Title: Water at Vadodi at 8 feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.