अंतरगाव प्रकल्पाच्या पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 09:52 PM2018-10-01T21:52:25+5:302018-10-01T21:52:40+5:30

अंतरगाव प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी सोडण्यासाठी लावण्यात आलेल्या पाईपमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. मागील पाच ते सहा वर्षांपासून ही बाब पाटबंधारे उपविभागाकडून दुर्लक्षित आहे.

Water wastage of intergovernmental plant | अंतरगाव प्रकल्पाच्या पाण्याचा अपव्यय

अंतरगाव प्रकल्पाच्या पाण्याचा अपव्यय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंगरखर्डा : अंतरगाव प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी सोडण्यासाठी लावण्यात आलेल्या पाईपमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. मागील पाच ते सहा वर्षांपासून ही बाब पाटबंधारे उपविभागाकडून दुर्लक्षित आहे.
अंतरगाव प्रकल्पाचा डावा कालवा १९, तर उजवा कालवा सात किलोमीटर आहे. धरणाच्या वेस्टवेअरवरील नाल्यावर लोखंडी पाईप टाकून उजव्या कालव्याला पाणी सोडले जाते. या पाईपला छीद्र पडले आहे. मागील पाच-सहा वर्षांपासून ही दुरुस्ती करण्याचे सौजन्य पाटबंधारे उपविभाग क्र.५ ने दाखविले नाही. काही वर्षांपूर्वी तुडुंब भरणारा अंतरगाव प्रकल्प मागील दोन वर्षांपासून कसाबसा ५० टक्के भरलेला दिसत आहे. सडलेल्या अवस्थेतील पाईपमधून वाहणाऱ्या पाण्याचा फायदा शेतकºयांना होत नाही. थेट नाल्यातून पाणी वाहून जाते. अनेक शेतकरी या प्रकल्पाच्या पाण्यावर विसंबून राहून शेती करतात. कालव्याला पाणी सोडल्यास छीद्र पडलेल्या पाईपमधून पाणी वाया जाते. तसेच डाव्या कालव्याच्या अनेक ठिकाणाहून पाणी पाझरत असल्याने तेथेही दुरुस्तीची गरज आहे.

Web Title: Water wastage of intergovernmental plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.