पहिल्याच पावसात जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 05:00 AM2020-07-24T05:00:00+5:302020-07-24T05:00:06+5:30

विदर्भावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. मान्सूनचे वारे बाष्प घेऊन आले आहेत. यामुळे जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गत तीन दिवसात जिल्ह्यात सरासारी ५० मिमी पाऊस कोसळला आहे. बुधवारी जिल्ह्यात सरासरी १८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गुरूवारीही चांगलाच पाऊस बरसला आहे. या पावसाने खोलगट भागात पाणी शिरून मोठे नुकसान झाले.

Watery in the first rain | पहिल्याच पावसात जलमय

पहिल्याच पावसात जलमय

Next
ठळक मुद्देयवतमाळ शहर : रहिवासी वस्त्या, दुकानांमध्ये शिरले पुराचे पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गत तीन दिवसापासून जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. जिल्ह्यात गत २४ तासात सरासरी १८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. हवामान विभागाने दोन दिवस पावसाचे सांगितले आहेत.
यवतमाळ शहरात यंदाचा पहिलाच धुव्वाधार पाऊस गुरुवारी बरसला. या पहिल्याच पावसात शहर जलमय झाले. अनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरुन नुकसान झाले. अनेक भागात पालिकेने सिमेंट रस्ता बांधल्यामुळे रस्ता उंच आणि घरे ठेंगणी झाली आहे. त्यामुळे घरात पाणी शिरण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले. बेंबळा धरणावरून पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी ठिकठिकाणी रस्ते खोदले जात आहे. त्यामुळे गुरुवारच्या पावसात अनेक वस्त्यांमधील रस्ते चिखलमय झाले.
विदर्भावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. मान्सूनचे वारे बाष्प घेऊन आले आहेत. यामुळे जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गत तीन दिवसात जिल्ह्यात सरासारी ५० मिमी पाऊस कोसळला आहे. बुधवारी जिल्ह्यात सरासरी १८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गुरूवारीही चांगलाच पाऊस बरसला आहे. या पावसाने खोलगट भागात पाणी शिरून मोठे नुकसान झाले.
जिल्ह्यात गत दोन महिन्यात २०८ मिमी पाऊस बरसला आहे. यवतमाळात ३.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. बाभूळगाव ६.३, कळंब ७.८, दारव्हा २.३, दिग्रस ९.३, आर्णी ७.१, नेर ६.२, पुसद १०.५, उमरखेड २४.७, महागाव २३.०, वणी ७१.९, मारेगाव ३०.५, झरी २३.०, केळापूर ३२.२, घाटंजी १४.६ तर राळेगाव ७.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

वणी शहरात अतिवृष्टी
बुधवारी वणी तालुक्यात अतिवृष्टी झाली. या ठिकाणी सर्वाधिक ७१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. बुधवारी वणीमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली.

Web Title: Watery in the first rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस