सव्वाचार कोटींच्या हरितपट्ट्याला वाळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 09:32 PM2019-05-12T21:32:29+5:302019-05-12T21:33:10+5:30

नगर परिषदेत केंद्राच्या हरितपट्टा योजनेतून तब्बल २५ नवीन उद्याने तयार केली जात आहे. चार कोटी २५ लाख रुपये या उद्यानावर आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र या उद्यानांचे काम अतिशय थातूरमातूर सुरू आहे. हरितपट्ट्यालाच वाळवी लागल्याचे चित्र दिसत आहे.

Waves of Rs | सव्वाचार कोटींच्या हरितपट्ट्याला वाळवी

सव्वाचार कोटींच्या हरितपट्ट्याला वाळवी

Next
ठळक मुद्देयवतमाळ नगर परिषद : शहरातील २५ उद्यानांचे काम थातूरमातूर, १४ उद्यानांची असमाधानकारक स्थिती

सुरेंद्र राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगर परिषदेत केंद्राच्या हरितपट्टा योजनेतून तब्बल २५ नवीन उद्याने तयार केली जात आहे. चार कोटी २५ लाख रुपये या उद्यानावर आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र या उद्यानांचे काम अतिशय थातूरमातूर सुरू आहे. हरितपट्ट्यालाच वाळवी लागल्याचे चित्र दिसत आहे.
यवतमाळ शहराचा विस्तार झाला. लगतच्या ग्रामपंचायतींचा पालिकेमध्ये समावेश करण्यात आला. यानंतर केंद्र शासनाकडून वाढीव भागासाठी निधी प्राप्त झाला आहे. हरितपट्ट्यांतर्गत ई-निविदा प्रक्रिया करून शहरात २५ नवीन उद्याने तयार केली जात आहे. यासाठी आर्थिक तरतूद असली तरी प्रत्यक्ष निधी मिळाला नाही. नियोजन विभागाकडे १५ लाखांंची जेमतेम शिल्लक असताना नव्या उद्यानाच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले. लातूर येथील हळकुडे एजंसी, आरआर कन्स्ट्रक्शन नागपूर व जगन्नाथ कन्स्ट्रक्शन यवतमाळ या तीन संस्था उद्यान निर्मितीचे काम करीत आहे. यामध्ये सर्व उद्यानाची किंमत ही दहा लाखांच्यावर निश्चित करण्यात आली आहे. प्रत्यक्ष उद्यानाची स्थिती पाहता तेथे दोन लाखांचेही काम झाल्यासारखे दिसत नाही.
मंजूर २५ उद्यानापैकी १४ उद्यानाची कामे सुरु आहे. मात्र यावर पालिकेच्या तांत्रिक विभागाने असमाधानकारक प्रगती असा शेरा मारला आहे. तर उर्वरित ११ कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत. एकंदरच उद्यान निर्मितीचा देखावा निवडणुकीच्या तोंडावर केला जात आहे. पर्याप्त निधी नसताना कार्यादेश देऊन कंत्राटदाराचे हित साधण्याचा प्रयत्न पालिकेच्या यंत्रणेने केला आहे.

उद्याने आणि त्यांचे बजेट
अमराई (वडगाव रोड) - १३ लाख
प्रसादनगर - ९ लाख ६६ हजार
आठवले ले-आऊट - १२ लाख
तिरुपतीनगर लोहारा - १८ लाख
बालाजी पार्क - ३९ लाख
शिरे ले-आऊट - २४ लाख
शर्मा ले-आऊट -१२ लाख २० हजार
अलमासनगर - ९ लाख
नवीन सव्वालाखे नगर - १२ लाख
जुने सव्वालाखेनगर - १२ लाख
मालाणी सोसायटी-९ लाख ५० हजार
निरोही ले-आऊट-१० लाख ३८ हजार
गुरुकृपानगर - ८ लाख ३८ हजार
उन्नती पार्क - १३ लाख ४१ हजार
विदर्भ हाऊसिंग - ४ लाख ७१ हजार
बालाजी पार्क - १६ लाख ८० हजार
देशमुख ले-आऊट-९ लाख ६० हजार
चांदोरेनगर - २४ लाख ३७ हजार
गणेशनगर - २४ लाख
विकास आराखड्यातील साईट क्र. १८/१ - १६ लाख ९५ हजार

Web Title: Waves of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.