३९ लाख वृक्ष कोमेजण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 10:02 PM2017-10-04T22:02:33+5:302017-10-04T22:02:44+5:30

गेल्या जुलै महिन्यात जिल्ह्यात लावण्यात आलेले ३९ रोपटे अवघ्या दोन महिन्यातच कोमेजण्याच्या मार्गावर आहे.

On the way to burning 39 million trees | ३९ लाख वृक्ष कोमेजण्याच्या मार्गावर

३९ लाख वृक्ष कोमेजण्याच्या मार्गावर

Next
ठळक मुद्देमाळरान पुन्हा उजाड : वृक्ष लागवडीत संवर्धनाची सोयच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेल्या जुलै महिन्यात जिल्ह्यात लावण्यात आलेले ३९ रोपटे अवघ्या दोन महिन्यातच कोमेजण्याच्या मार्गावर आहे. वृक्ष लागवड योजनेत वृक्ष संवर्धनाची सोय नसल्याने शासनाची ही महत्त्वाकांक्षी योजना कागदोपत्रीच राबविण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
शासकीय योजना केवळ भपकेबाजपणासाठी राबविल्या जातात. योजना राबविताना येणाºया अडचणी व उपाययोजनांचा विचार होत नसल्याने त्या पूर्णत: फसतात. वन विभागातर्फे राबविण्यात आलेल्या ५० कोटी वृक्ष लागवड योजनेचीही तीच गत झाली आहे. जिल्ह्यात या योजनेत तब्बल ३९ हजार लाख रोपट्यांची लागवड करण्यात आली. ही रोपटी सप्टेंबरमध्येच अखेरच्या घटका मोजत आहे. त्यातच पुढील पावसाळ््यात १३ कोटी रोपटी लावण्याचे नियोजन केले जात आहे.
वृक्ष लागवड योजना ‘पुढे पाठ, मागे सपाट’ अशा पद्धतीने राबविली गेली. खड्डा तोच, झाड नवीन, या पद्धतीने नियोजन केले गेले. केवळ जाहिरातबाजी करून काही तरी मोठे अभियान हाती घेतल्याचे दर्शविण्यासाठी वृक्ष लागवडीचे आकडे फुगवले जात आहे. जिल्ह्याला जुलै २०१७ मध्ये २५ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. मात्र येथील वनविभागाच्या यंत्रणेने त्याही पुढे एक पाऊल टाकत तब्बल २७ लाख झाडांची लागवड केली. इतर शासकीय यंत्रणांनी १२ लाख झाडे लावल्याचे सांगून स्वत:ची पाठ थोपटून घेतली.
हा पराक्रम त्यांनी केवळ जुलै महिन्यातील एका आठवड्यातच पूर्ण करीत वनमंत्र्यांचे छायाचित्र छापून गाजावाजा केला. प्रत्यक्षात ही सर्व झाडे आता कोमेजण्याच्या मार्गावर आहे.
जुन्या खड्ड्यात नवीन झाड
यावर्षी जिल्ह्यात केवळ ६० टक्के पाऊस झाला. यवतमाळ, राळेगाव, कळंबमध्ये सर्वात कमी पाऊस झाला. परिणामी पर्यावरण प्रेमाचा आव आणून लावलेली झाडे आता सुकण्याच्या मार्गावर आहे. त्यांना वाचविण्यासाठी वन विभागाकडे कोणतीच तरतूद नाही. परिणामी पुढीलवर्षी वन विभागाच्या १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी जुनेच खड्डे कामात येण्याच शक्यता आहे. वनमंत्र्यांची महत्वाकांक्षी ५० कोटी वृक्ष लागवडीची योजना एकाच खड्ड्यात दरवर्षी नवीन झाड लावून पूर्णत्वास जाण्याचे संकेत यातून मिळत आहे.

Web Title: On the way to burning 39 million trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.