काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकत्र्याचा सन्मान करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 06:00 AM2020-02-16T06:00:00+5:302020-02-16T06:00:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : गेल्या पाच वर्षात भाजपने सूडाचे राजकारण केले. काँग्रेसच्या स्थानिक कार्यकत्र्याना निवडून निवडून त्यांचा छळ ...
Next
ल कमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या पाच वर्षात भाजपने सूडाचे राजकारण केले. काँग्रेसच्या स्थानिक कार्यकत्र्याना निवडून निवडून त्यांचा छळ करण्यात आला. त्यांची कामे जाणिवपूर्वक अडविण्यात आली. मात्र आता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये प्रत्येक काँग्रेस कार्यकत्र्याचा सन्मान करू, अशी ग्वाही शुक्रवारी मंत्री-आमदारांनी जाहीरपणो दिली.महाविकास आघाडीसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर विदर्भातील काँग्रेसचे मंत्री, आमदार यांच्या सत्काराचा सोहळा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी येथे पार पडला. अध्यक्षस्थानी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद होते. विधानसभेत काँग्रेसचे अनेक उमेदवार अगदी थोडय़ा फरकाने पराभूत झाले. त्यामुळे आता पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याबाबत यावेळी एकमत व्यक्त करण्यात आले. शिवाय, कार्यकर्ते हाच पक्षाचा आत्मा आहे. त्यामुळे सत्तेत आलो तरी कार्यकत्र्याना विसरून चालणार नाही. विविध समित्यांच्या माध्यमातून त्यांनाही सामावून घेतले पाहिजे, असा सूर सर्वच नेत्यांनी व्यक्त केला.यावेळी माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके म्हणाले, लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर आपली वाटचाल कुठवर झाली, याचे सिंहावलोकन केले पाहिजे. या जिल्हय़ातील मतदार हुशार आहेत. निवडून दिले तर ते काँग्रेसचे सर्वच उमेदवार निवडून देतात. अन् पाडले तर सर्वच उमेदवार पाडतात. काँग्रेसमध्ये समर्पित भावनेने काम करणारे कार्यकर्ते आहेत. पण तिकिट नाकारले की अपक्ष उभे राहायचे, हा मुर्खपणा आता थांबवला पाहिजे.माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे म्हणाले, आज काँग्रेस महाविकास आघाडीसोबत सत्तेत सहभागी झाले, हे ठिक आहे. पण जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समित्या अशा सर्व ठिकाणी काँग्रेस चौथ्या नंबरवर पोहोचली आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. जोर्पयत काँग्रेस ओबीसींना प्राधान्य देणार नाही, तोर्पयत पार्टीची स्थिती दुरुस्त होणार नाही. सोशल इंजिनिअरिंग होणो गरजेचे आहे. नेत्यांनी पक्षसंघटन वाढवावे : विजय दर्डागुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या संकटकाळात नेहमी पुढाकार घेतला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिङर यांनी जिल्हय़ातील कार्यकत्र्यामध्ये नवा उत्साह निर्माण केला आहे. आजच्या मेळाव्यातूनही त्यांनी नव्या उमेदीचा संदेश दिला आहे. सर्व मतभेद बाजूला ठेवून आता नेत्यांनी पक्ष संघटन वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मत लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले. मेळाव्यातून पुढे आलेल्या अपेक्षापक्षात निर्णय त्वरित झाले पाहिजेराज्य शासनाच्या योजनांचा प्रचार कार्यकत्र्यामार्फत कराजे नेते पक्षासाठी झटत नाही, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजेकाम करणा:या कार्यकत्र्याना विविध समित्यांमध्ये सामावून घ्यामुंबईत येणा:या कार्यकत्र्याचे काम झाले पाहिजे.प्रचाराच्या पद्धती बदला. सोशल मीडियावर प्रचार वाढविला पाहिजे