अवघ्या ६० रुपयात झाला लग्नसोहळा ; ३० रुपयांचे मुरमुरे वाटून आनंद साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 05:13 PM2020-04-26T17:13:19+5:302020-04-26T17:16:57+5:30

लग्न म्हटले की, लाखोंचा हुंडा आणि त्यापेक्षा दुप्पट मानपानावर उधळपट्टी. मात्र यंदा कोरोनाने अशा खर्चिक स्वप्नांचा चुराडा केला आहे. त्यामुळे धनदांडगे खंतावलेले असले तरी गोरगरिबांनी मात्र अद्यापही समंजसपणाच जपला आणि लग्नावरचा खर्च टाळला.

The wedding ceremony was held for only 60 rupees; Celebrate by sharing Rs 30 | अवघ्या ६० रुपयात झाला लग्नसोहळा ; ३० रुपयांचे मुरमुरे वाटून आनंद साजरा

अवघ्या ६० रुपयात झाला लग्नसोहळा ; ३० रुपयांचे मुरमुरे वाटून आनंद साजरा

googlenewsNext
ठळक मुद्देशेंबाळपिंपरीची नवरी आणि उमरखेडचा नवरदेव

नंदकिशोर बंग ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लग्न म्हटले की, लाखोंचा हुंडा आणि त्यापेक्षा दुप्पट मानपानावर उधळपट्टी. मात्र यंदा कोरोनाने अशा खर्चिक स्वप्नांचा चुराडा केला आहे. त्यामुळे धनदांडगे खंतावलेले असले तरी गोरगरिबांनी मात्र अद्यापही समंजसपणाच जपला आणि लग्नावरचा खर्च टाळला. येथील एका गरीब कुटुंबाने तर रविवारी चक्क ६० रुपयात लग्न सोहळा उरकून सर्वांना चकित केले.
पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी गावात हा स्तुत्य प्रकार रविवारी सकाळी घडला. येथील रमेश रामजी भवर यांच्या दुर्गा नामक मुलीचा विवाह खरुस ता. उमरखेड येथील संभाजी यादवराव जाधव यांच्या अमोल नामक मुलाशी जुळला होता. साखरपुडा काही दिवसांपूर्वीच आटोपला. परंतु लॉकडाऊनमुळे लग्नाची तारीख ठरत नव्हती. दोन्ही कुटुंबातील आप्त मंडळी त्यामुळे विचारात पडली होती. अखेर मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह करण्याचे ठरले आणि तो दिवस रविवारी उजाडला.
नवरदेव, नवरदेवाचे वडील व एक पाहुणा तर नवरी, नवरीचे आई-वडील, भाऊ यांच्या उपस्थितीत हे लग्न झाले. बॅन्ड, मंडप, हारतुरे, जेवणावळी, आहेर हा सर्व प्रकार टाळण्यात आला. सकाळी ६ च्या सुमारास नवरीच्या घरासमोर दोघांनी एकमेकांना पुष्पगुच्छ दिले. लगेच नवरीकडील पाहुण्यांनी ३० रुपयांची मुरमुऱ्याची थैली व एक सोनपापडीचा पुडा आणून वाटप केला. अवघ्या ६० रुपयात सर्वांचे तोंड गोंड झाले. ७ वाजता नवरदेव नवरीला घेऊन अगदी आनंदात निघून गेला.

Web Title: The wedding ceremony was held for only 60 rupees; Celebrate by sharing Rs 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.