कल्याण निधी आपत्ती व्यवस्थापनासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 05:00 AM2020-07-01T05:00:00+5:302020-07-01T05:00:13+5:30

जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदाताई पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, समाज कल्याण सभापती विजय राठोड, महिला व बालकल्याण सभापती जयश्री पोटे यांच्या उपस्थितीत हा धनादेश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्याकडे सुपूृर्द करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी कोरोनाग्रस्ताना मदत करा, गरीब कुटुंब आणि नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले होते.

Welfare Fund for Disaster Management | कल्याण निधी आपत्ती व्यवस्थापनासाठी

कल्याण निधी आपत्ती व्यवस्थापनासाठी

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा पुढाकार : ९३ लाखांचा धनादेश सुपूर्द

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना महामारीच्या संकटात शासन विविध उपाययोजना राबवित आहे. यात शासनाला अनेक ठिकाणी आर्थिक मर्यादा जाणवत आहे. या संकटात यवतमाळ जिल्हा परिषदेने कर्मचारी कल्याण निधीतून तब्बल ९२ लाख ८९ हजार ११३ रुपयांची मदत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीला केली. याचा धनादेश मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदाताई पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, समाज कल्याण सभापती विजय राठोड, महिला व बालकल्याण सभापती जयश्री पोटे यांच्या उपस्थितीत हा धनादेश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्याकडे सुपूृर्द करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी कोरोनाग्रस्ताना मदत करा, गरीब कुटुंब आणि नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत तसेच गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेतील सर्वच संघटनांनी कल्याण निधी कोरोना उपाययोजनांसाठी वापरला जावा, ही मागणी लावून धरली होती. याचीच दखल घेत जिल्हा परिषदेतील कर्मचारी कल्याण समितीने निर्णय घेतला व जमा असलेल्या दोन कोटीपैकी ९२ लाख ८९ हजार ११३ रुपये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीला देण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Welfare Fund for Disaster Management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.