दारव्हा येथे विहिरी ३०० अन् अर्ज अडीच हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 10:17 PM2017-11-27T22:17:08+5:302017-11-27T22:17:45+5:30

तालुक्यात धडक सिंचन विहिरींची सोमवारी दुपारी सोडत काढण्यात आली. ईश्वरचिठ्ठीने लाभार्थी निवडण्यात आले.

Wells 300 and application is 2.5 thousand in Darwha | दारव्हा येथे विहिरी ३०० अन् अर्ज अडीच हजार

दारव्हा येथे विहिरी ३०० अन् अर्ज अडीच हजार

Next
ठळक मुद्देबचत भवनात सोडत : ५६ गावांत लक्षांक नसल्याने लाभच नाही

आॅनलाईन लोकमत
दारव्हा : तालुक्यात धडक सिंचन विहिरींची सोमवारी दुपारी सोडत काढण्यात आली. ईश्वरचिठ्ठीने लाभार्थी निवडण्यात आले. यामध्ये दोन हजार ५९७ अर्जदार शेतकºयांपैकी केवळ ३०० जणांनाच सिंचन विहिरीचा लाभ मिळाला. तालुक्यात बहुतांश गावांमध्ये लक्षांक नसल्याने येथील अर्जदार शेतकरी विहिरीपासून वंचित राहिले आहे.
धडक सिंचन योजनेच्या माध्यमातून कोरडवाहू शेतकºयांना सिंचन क्षेत्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात या आर्थिक वर्षात लाभासाठी ८४ गावांतून दोन हजार ५९७ अर्ज आले होते. या अर्जातून लाभार्थी निवडण्यासाठी तालुकास्तरीय निवड समितीने स्थानिक बचत भवनात सोडत आयोजित केली होती. यावेळी उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, उपविभागीय सिंचन अभियंता, तहसीलदार उपस्थित होते. ईश्वरचिठ्ठीने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये ३०० शेतकºयांना सिंचन विहीर मिळाली आहे. आता वेळेत अनुदान प्राप्त झाल्यास शेतकºयांना पावसाळ्यापूर्वी विहीर खोदून तिचे बांधकाम करता येणार आहे. त्या दृष्टिकोनातून प्रशासकीय यंत्रणेने पाठपुरावा करावा व कामाची गती वाढवावी, अशा सूचनाही तालुकास्तरीय समितीच्यावतीने करण्यात आल्या. धडक सिंचन विहिरीच्या सोडतीसाठी संपूर्ण तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने आले होते. या परिसरात दिवसभर शेतकºयांची वर्दळ होती.
विहीर न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांचा हिरमोड
सिंचन विहिरीच्या माध्यमातून हिरव्या शिवाराचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक शेतकºयांचा ईश्वरचिठ्ठीत लाभ न मिळाल्याने हिरमोड झाला, तर सिंचन विहीर मिळाल्याने आनंद व्यक्त करणारेही लाभार्थी येथे होते. एकंदरच बचत भवन परिसरात कभी खुशी, कभी गम असे वातावरण पाहायला मिळत होते. लक्षांक नसलेल्या गावातील स्थिती अतिशय बिकट आहे. येथील शेतकरी अजूनही सिंचन विहिरींच्या प्रतीक्षेत आहेत.

 

Web Title: Wells 300 and application is 2.5 thousand in Darwha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.