क्या हुआ तेरा वादा! पंतप्रधान मोदींना आठवण करुन देणार आर्णीचा युवक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 06:49 PM2017-12-01T18:49:02+5:302017-12-01T18:50:29+5:30
क्या हुआ तेरा वादा! ओ कसम ओ इरादा! चे बॅनरवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र सायकलवर बांधून आर्णीचा अवधूत गायकवाड दाभडी ते वडनगरपर्यंत जनधन योजनेच्या बँक पासबुकच्या झेरॉक्स घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गावात नेऊन देणार आहे. त्याने 1 डिसेंबरपासून सायकलने प्रवासाला सुरूवात केली आहे.
आर्णी (यवतमाळ): क्या हुआ तेरा वादा! ओ कसम ओ इरादा! चे बॅनरवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र सायकलवर बांधून आर्णीचा अवधूत गायकवाड दाभडी ते वडनगरपर्यंत जनधन योजनेच्या बँक पासबुकच्या झेरॉक्स घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गावात नेऊन देणार आहे. त्याने 1 डिसेंबरपासून सायकलने प्रवासाला सुरूवात केली आहे.
2014 मध्ये लोकसभा निवडणूकी पुर्वी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी तालुक्यातील दाभडी येथे चाय पे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करून देशातील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. यातून शेतकऱ्यांना विविध आमिष दाखवले. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव, कापूस ते कापड असे उद्योग स्थापणा करणार. देशाबाहेरील बँकेत असलेले काळा पैसा परत आणून, प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रूपये जमा करणार, अशी आश्वासने या कार्यक्रमामधून दिली होती. आता त्यांच्या सरकारने तीन वर्षे पुर्ण केली आहेत.
लोकांनी जनधन योजनेअंतर्गत बँकेत खाते उघडले. परंतु त्यात पैसे जमा झाले नाही. म्हणून शहरातील अवधूत गायकवाड यांने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाभडीत केलेल्या वाद्याची (वचनाची) आठवण करूण देण्यासाठी आज 1 डिसेंबर रोजी दाभडीच्या शेतकरी शेतमजुरांच्या जनधन बँक खात्याच्या पुस्तकांच्या झेरॉक्स काढून त्या नरेंद्र मोदी यांच्या गावी वडणनर गुजरात येथे नेऊन देणार आहे. जाताना लागणाऱ्या गावातील नागरिकांचे बँक खाते तो नेऊन त्यांना दाभडीत दिलेल्या आश्वासनांची आठवण या माध्यमातून करूण देणार आहे.