खासदारांंचा शंभर दिवसात परफॉर्मन्स काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 06:00 AM2019-09-19T06:00:00+5:302019-09-19T06:00:05+5:30

गेल्या शंभर दिवसात कुण्या खासदाराचा काय परफॉर्मन्स राहिला याबाबत जिल्हाभर चर्चा झडत आहे. त्यात चंद्रपूर व हिंगोलीच्या खासदारांबाबत मतदार काहीसे समाधानी दिसत आहेत. त्याच वेळी यवतमाळ-वाशिमच्या खासदारांचे फारसे दर्शनही नसल्याचा जनतेतील सूर आहे.

What is the MP's performance in a hundred days? | खासदारांंचा शंभर दिवसात परफॉर्मन्स काय?

खासदारांंचा शंभर दिवसात परफॉर्मन्स काय?

Next
ठळक मुद्देहेमंत पाटील मतदारसंघात सक्रिय : धानोरकरांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी, मात्र भावनाताई आहेत कुठे ?

राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्रातील भाजप सरकारला सत्तेत येऊन शंभर दिवस पूर्ण झाले. या शंभर दिवसात जिल्ह्यातील तीनही खासदारांचा परफॉर्मन्स काय? याची चर्चा मतदारांमध्ये होऊ लागली आहे. त्यात यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या खासदार भावनाताई गवळी नेमक्या आहेत कुठे ? याचीच चर्चा सर्वाधिक होताना दिसते आहे.
गेल्या शंभर दिवसात कुण्या खासदाराचा काय परफॉर्मन्स राहिला याबाबत जिल्हाभर चर्चा झडत आहे. त्यात चंद्रपूर व हिंगोलीच्या खासदारांबाबत मतदार काहीसे समाधानी दिसत आहेत. त्याच वेळी यवतमाळ-वाशिमच्या खासदारांचे फारसे दर्शनही नसल्याचा जनतेतील सूर आहे. चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार सुरेश धानोरकर विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. आपल्या लोकसभा मतदारसंघातील वणी, आर्णीसह सहाही जागांवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. मी सूचवेल त्याला काँग्रेसने उमेदवारी द्यावी, या सहाही जागा निवडून आणण्याची जबाबदारी माझी, असा प्रस्ताव त्यांंनी पक्षश्रेष्ठींपुढे ठेवल्याची माहिती आहे. इकडे हिंगोलीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील हेसुद्धा जिल्ह्यातील आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या महागाव, उमरखेड तालुक्यात सक्रीय आहेत. सेना कार्यकर्त्यांच्या जेवणावळी होताना दिसत आहेत. जनतेच्या प्रश्नावर त्यांनी आक्रमक भूमिकाही घेतली आहे. मात्र या सर्वबाबींना खासदार भावनाताई गवळी जणू अपवाद ठरल्या आहेत.
गेल्या शंभर दिवसात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौºयात नेर ते चिखलीपर्यंत उपस्थिती एवढेच काय ते तार्इंचे दर्शन शिवसैनिक व मतदारांना होऊ शकले. भावनातार्इंनी रिसोडपासून यवतमाळपर्यंतची आपली संपर्क कार्यालये बंद केली, निवडणुकीपर्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे कार्यकर्तेही अचानक दूर केले, कार्यालय, मेस, चहा-पान सर्वच अचानक बंद झाल्याने कालपर्यंत त्यांच्यासाठी झटणारे शिवसैनिक बुचकाळ्यात पडले आहेत.
तार्इंनी अचानक अशी टाळे ठोकण्याची भूमिका घेण्यामागे त्यांची पक्षश्रेष्ठींवरील नाराजी हे प्रमुख कारण असल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगितले जाते. भावनाताई पाचव्यांदा शिवसेनेकडून लोकसभेवर निवडून गेल्या. एकमेव महिला खासदार असूनही शिवसेनेकडून त्यांना मंत्री पदावर संधी दिली गेली नाही, हे त्यांच्या नाराजीचे प्रमुख कारण सांगितले जाते. शंभर दिवसात तार्इंचे जिल्ह्यात फारसे दर्शन झाले नाही. गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच शिवसेनेला मतांची आघाडी देणाºया पुसद मतदारसंघातही ताई फिरकल्या नाहीत. त्यांंचा बहुतांश मुक्काम दिल्लीतच असल्याचे सांगण्यात येते. लगतच्या अमरावती जिल्ह्यातील खासदार नवनीत राणा सातत्याने संसदेत प्रश्न मांडताना दिसतात. मात्र दिल्लीत राहूनही भावनाताई सभागृहात प्रश्न मांडताना कधीच कशा झळकत नाहीत, याचे कोडे शिवसैनिकांना उलगडलेले नाही. ताई अलिकडे पक्षाच्या कार्यक्रमातही दिसत नाहीत, जिल्हा प्रमुख पदावरील अलिकडे पक्षश्रेष्ठींनी केलेला ‘जैसे थे’ बदल हे तर या गैरहजेरीमागील कारण नसावे ना असा शंकेचा सूर शिवसैनिकांच्या गोटातून ऐकायला मिळतो आहे. कालपर्यंत जीवाभावाचे वाटणाºया व एकजूट दाखविणाºया निकटवर्तीय कार्यकर्त्यांबाबत अचानक अविश्वासाचे वातावरण निर्माण होण्यामागील रहस्य गुलदस्त्यात आहे. त्यातूनच तार्इंच्या मागे एकजुटीने उभ्या राहिलेल्या शिवसैनिकांमध्येही आता फूट पडल्याचे चित्र आहे. त्यातील काही शिवसैनिक पक्षातील दुसºया गटाला जाऊन मिळाले आहेत. तार्इंकडे आता साधे रेल्वे आरक्षणासाठीचे पत्र मिळणेही दुरापास्त झाले आहे. दुसºया गटाशी विरोध घेऊन तार्इंच्या पाठीशी राहिलेले कार्यकर्ते सैरभैर झाले आहे.

भाजपचे खुले आव्हान, तरीही शिवसेना मवाळ
विरोधी बाकावर असताना प्रचंड दहशत असलेल्या शिवसेनेची सत्तेत येताच आक्रमकता गेली कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी वेळप्रसंगी सातही मतदारसंघात पक्षाचे आमदार निवडून आणू, असे खुले आव्हान दिले. मात्र त्यावर शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही किंवा आक्रमकरीत्या त्यावर पलटवार झाला नाही. गेल्या पाच वर्षात शिवसेनेने भाजपला कुठेच क्रॉस केल्याचे ऐकिवात नाही. शिवसेनेची ही मवाळ भूमिका पाहता आपल्या सत्तेतील वाट्याला धक्का लागू नये म्हणून शिवसेना नेत्यांनी भाजपसोबत सरसकट तडजोडीची भूमिका तर स्वीकारली नाही ना! अशी शंका व्यक्त केली जात आहे. सत्तेपुढे म्यान केलेल्या तलवारी गेल्या पाच वर्षात एकदाही शिवसेना नेत्यांनी भाजप विरोधात उपसल्याचे पहायला मिळाले नाही, हे विशेष.

अन्य पक्षात एकच तर सेनेत तीन जिल्हा प्रमुख
भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्वच पक्षात संपूर्ण जिल्ह्याची धुरा एकाच अध्यक्षांकडे असताना शिवसेना मात्र याला अपवाद ठरली आहे. शिवसेनेला एक नव्हे तर तब्बल तीन जिल्हा प्रमुख देण्यात आले आहे. तिघांच्या दिशा वेगवेगळ्या असल्याने निष्ठावंत शिवसैनिकांची मात्र ‘नेमकी कुणाची कास धरावी’ याबाबत कोंडी होताना दिसते आहे. हे जिल्हा प्रमुख आपल्या कार्यक्षेत्रापुरते मर्यादित झाले आहेत.
शिवसेनेला जागा वाढविण्याची संंधी
जिल्ह्यात दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व अबाधित आहे. याशिवाय सत्तेत राहून सेनेने उमरखेड व वणीमध्ये भाजपपुढे आव्हान उभे केले आहे. या जागांसाठी शिवसेनेने वाटाघाटीत आग्रह धरल्यास जिल्ह्यात सेना आमदारांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. याशिवाय युती कायम राहिली व ‘ठरल्याप्रमाणे’ पक्षांतर झाल्यास पुसदची जागाही सेनेच्या पारड्यात जाऊ शकते. मात्र जिल्ह्यातील शिवसेना नेते तिकीटांसाठी पक्षश्रेष्ठी आणि भाजपपुढे आपली बाजू किती आक्रमकपणे मांडतात, यावर सर्वकाही अवलंबून आहे.

Web Title: What is the MP's performance in a hundred days?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.