जब तुम सक्षम हो जाना, माँ के लिए एक झुला लाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:23 PM2019-02-14T22:23:27+5:302019-02-14T22:24:55+5:30
आईची महिमा, शेतकऱ्यांची स्थिती, शासन, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, सरकार, देशापुढील विविध समस्यांवर हास्यातून व्यंग निर्मिती करून अंतर्मुख करणाºया कवितांनी प्रेक्षकांना खिळऊन ठेवले. निमित्त होते कळंब येथे हास्य कविसंमेलनाचे. उपस्थितांची मिळालेली उदंड दाद कविसंमेलनाच्या यशस्वीतेची पावती ठरली.
गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : आईची महिमा, शेतकऱ्यांची स्थिती, शासन, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, सरकार, देशापुढील विविध समस्यांवर हास्यातून व्यंग निर्मिती करून अंतर्मुख करणाऱ्या कवितांनी प्रेक्षकांना खिळऊन ठेवले. निमित्त होते कळंब येथे हास्य कविसंमेलनाचे. उपस्थितांची मिळालेली उदंड दाद कविसंमेलनाच्या यशस्वीतेची पावती ठरली.
येथील चिंतामणी देवस्थान समितीतर्फे आयोजित चिंतामणी जन्मोत्सवात प्रसिध्द हास्यकवी किरण जोशी, कपिल बोरुंदिया, नम्रता नमिता आणि डॉ.संतोष मुजुमदार यांनी विविध आशयाच्या विविधांगी कवितांचे सादरीकरण केले. त्यांचे शब्दरुपी फटकारे अनेकांना घायाळ करून गेले तर कधी गुदगुल्या व्हायच्या याचाही पत्ता लागायचा नाही. कधी डोळ्यात पाणी तर कधी अंतर्मुख करणारे शब्द मनाला भेदायचे.
कपडे उतारणाही अगर सभ्यता है
तो हम बहोत अभागी है
क्यु की जानवर हमसे
दो कदम आगे है
या कवितेतून किरण जोशी यांनी बदलत चाललेल्या संस्कृतीची व्यथा मांडली. त्यांचा शब्दनशब्द प्रत्येकाच्या मनाला भिडणारा होता. संस्कृतीचे होणारे अध्पतनावर त्यांची चिंता रास्तच होती.
मेरा बेटा ये तो जाणता है की
पिताजीको अंग्रेजी मे फादर कहते है
मगर मेरा बेटा यह नही जाणता की
रिस्पेक्ट को हिंदी मे आदर करते है
या कवितेतून कपिल बोरुंदिया यांनी येणाऱ्या पिढीमध्ये पडत असलेले अंतर अतिशय खुबीने शब्दबध्द केले.
जब तुम सक्षम हो जाना
माँ के लिए एक झुला लाना
या कवितेतून डॉ.संतोष मुजुमदार यांनी आईची महिमा कथन केली. आपल्या मुलांना लहानाचे मोठे करताना आईचे कष्ट मोजणारी फुटपट्टी अजूनही कोणाला निर्माण करता आली नाही. त्यामुळे मुलगा जेव्हा सक्षम होते तेव्हा आईची काळजी घेणे हे जबाबदारीच नाही तर सर्वांच प्रथम कर्तव्य आहे, असा या कवितेचा आशय होता.
क्या करना क्या कर रहे अण्णा
भुके रहके मर रहे अण्णा
खानेवाले खाते रहेंगे
तुम क्यु इतना डर रहे अण्णा
या कवितेतून निगरगट्ट व असंवेदनशील नेत्यांचे वाभाडे काढण्यात कसर सोडली नाही.
न जाने कितने सितारे है माँ के आंचल मे
ये वो जमीन है जो आसमान जैसी है
तुम्ही ने हक मुहब्बत का दिया है
मै अपना हक जताना चाहती हुं
या कवितेतून भोपाळ येथून आलेल्या नम्रता नमीता या कवयित्रीने आईची महानता सांगितली. अमोल कडूकर यांनी संचालन केले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे, उपाध्यक्ष चंद्रकांत गोसटवार, सचिव श्याम केवटे, सहसचिव राजेश भोयर पत्रकार न.मा.जोशी उपस्थित होते.